ambrish ghatge on kagal assembly seat | Sarkarnama

मी स्वयंघोषित नेता नाही : अंबरीश घाटगे

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

शिवसेनेकडून निवडणुक लढवायची. त्यासाठी कोणाशीही चार हात करण्याची आमची तयारी आहे. विधानसभा लढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे

- अंबरीश घाटगे 

म्हाकवे (कोल्हापूर): कागल तालुक्यातील स्वयंघोषीत नेते स्वतःची उमेदवारी स्वतःच जाहीर करीत आहेत. आमची उमेदवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाहीर करतील,  अशी टोलेबाजी जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ सभापती अंबरीश घाटगे यांनी केली.

मळगे खुर्द (ता.कागल) येथील विविध विकाविकासकामांची उदघाटने व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच हरी गुरव होते.
श्री घाटगे म्हणाले "तालुक्यात विधानसभेची निवडणूक दुरंगी, तिरंगी होणार हे आम्हास माहिती नाही. आम्ही मात्र निवडणूक शिवसेनेकडूनच लढविणार. कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.

स्वागत भास्कर पाटील यांनी केले. प्रस्ताविक महेश पाटील यांनी केले.  कार्यक्रमास एम .के . पाटील, उपसरपंच राजेंद्र पाटील, आर .बी.पाटील, नेताजी पाटील, भागवत पाटील, प्रकाश अडसूळ, शिवाजी पाटील, बंडू पाटील उपस्थित होते.
 
अमरिशदादा तुम्हीच लढवा
आम्ही सर्वच कार्यकर्ते आपल्या पाठीशी ठामपणे अहोत अमरिशदादा विधानसभा निवडणूक तुम्हीच लढवा. अशी विनंती प्रकाश अडसूळ यांनी केली यावर अंबरीश घाटगे म्हणाले, मी स्वयंघोषित नेता नसून पक्षाचा आदेश सर्वश्रुत आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख