Ambedkarite movement becomes directionless in search of financial security, says ad. prakash ambedkar | Sarkarnama

आर्थिक सुरक्षितता शोधताना आंबेडकरी चळवळ भरकटली : प्रकाश आंबेडकर 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

येणारा काळ हा आर्थिक बदलांचा असेल. अशा परिस्थितीत नवीन पिढी स्वतःच्या सामाजिक सुरक्षितता न बघता आर्थिक सुरक्षिततेला प्राधान्य देत आहे. त्यामुळेच दोन हजार वर्षानंतर आर्थिक सुरक्षितता शोधत आंबेडकरवाद्यांचे गणित बिघडल्याचे वंचीत बहुजन आघाडीचे प्रणेते ऍड. प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

अकोला : येणारा काळ हा आर्थिक बदलांचा असेल. अशा परिस्थितीत नवीन पिढी स्वतःच्या सामाजिक सुरक्षितता न बघता आर्थिक सुरक्षिततेला प्राधान्य देत आहे. त्यामुळेच दोन हजार वर्षानंतर आर्थिक सुरक्षितता शोधत आंबेडकरवाद्यांचे गणित बिघडल्याचे वंचीत बहुजन आघाडीचे प्रणेते ऍड. प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

कौलखेड रिंग रोडवरील जानोरकर मंगल कार्यालयात सोमवारी (ता.10) सायंकाळी वंचीत बहुजन आघाडीचे प्रणेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी बुद्धिजीवी वर्गाशी संवाद साधला. यावेळी आंबेडकर म्हणाले, की प्रचलित व्यवस्थेत विसंगतीची चर्चा सुरू झाली की सुरक्षिततेसाठी कवच शोधतो. जातीचे कवच हे सर्वात मोठे आहे. मात्र जातीचे कवच आले की अधोगती सुरू होते. समाज व्यवस्थेतील या बदलात टिकण्यासाठी मूलभूत गरजा ओळखून जीवन जगण्यासाठी एक नियमावली तयार करा. मी सुरक्षित झालो की संपले, ही वृत्ती सोडली पाहिजे. 

श्रोत्यांनी कॉंग्रेससोबत आघाडी करताना वंचित आघाडीसाठी मागितलेल्या जागा कमी करून आघाडी करण्याबाबत भूमिका काय, असा प्रश्‍न उपस्थित केला. त्यावर आघाडीबाबतची भूमिका स्पष्ट करण्याऐवजी सार्वजनिक ठिकाणी राजकीय भूमिका जाहीर केल्या जात नसल्याचे सावध उत्तर दिल्याने उपस्थित राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या. या राजकीय प्रश्‍नासोबतच समाजातील बुद्धिजीवींच्या सामाजिक प्रश्नांनाही त्यांनी उत्तरे दिली. या संवाद मेळाव्याला वंचित घटकातील डॉक्‍टर, अधिकारी, शिक्षिक, वकिल, कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांसह भारिप-बमसंच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.  

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख