ambedkar and government | Sarkarnama

आरक्षणावरुन ओबीसी-मराठा झुंज का लावता ? - प्रकाश आंबेडकर

योगेश पायघन
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

औरंगाबाद : सरकारची नियत साफ असेल तर ओबीसी आणि मराठा समाजात झुंज लावण्याची गरज काय ? असा सवाल करत ओबीसीला मंडल आयोगाने दिलेले आरक्षण ग्रुप एक आणि आताचे मराठा समाजाला दिलेले आरक्षण ग्रुप दोन करुन त्यात अंतर्गत बदल होणार नाही, अशी व्यवस्था करा. तरच ते न्यायालयात टिकू शकेल असे मत भारिपचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. 

तापडीया नाट्य मंदीरात शुक्रवारी (ता. 14) पार पडलेल्या ओबीसी हक्क परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, आता नव्याने जातीच्या कौशल्याला रुजवण्याचे काम सुरु आहे. जुन्या परंपरा नव्या बाटलीत भरण्याचे काम सुरु आहे. इथल्या व्यवस्थेला ओबीसींच्या हातात सत्ता नको आहे. विलासरावांनी दिलेली शिष्यवृत्ती त्यांच्या सरकारसोबत गेली. आताही राज्य शासनाने देऊ केलेली शिष्यवृत्ती एका वर्षापुरतीच दिली आहे. शिक्षणावरचा खर्च तीन टक्‍क्‍यावरुन आठ टक्‍क्‍यांवर नेला असता तर परिस्थिती वेगळी असती. 

परिषदेतील ठराव... 
-राज्य शासनाने मराठा समाजाला दिलेले आरक्षण ग्रुप 2 असे संबोधा. 
-ओबीसी ग्रुप एक व दोन यात अंतर्गत बदल नसण्याचा कायदा करा 
-आयआयटी सारख्या संस्थांत ओबीसींचे आरक्षणानुसार प्रवेश द्या. 
-मोफत प्राथमिक शिक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करा 
-खाजगी संस्थांसह तंत्र शिक्षण विनामूल्य प्रवेश द्या 
-ओबीसीला लोकसंख्येच्या तुलनेत राजकीय आरक्षण द्या. 
-ओबीसी आरक्षण उद्योग, शिक्षणात बंधनकारक करा 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख