अंबरनाथ नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेशी भाजप दोन हात करणार! 

अंबरनाथमध्ये नगराध्यक्षपदासाठी राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे यांची नगराध्यक्षपदाची अडीच वर्षांची मुदत संपत असल्याने येत्या आठवड्यात नवीन नगराध्यक्षांची निवड होण्याची शक्‍यता आहे. भाजप नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहे, अशी माहिती भाजपचे ठाणे-पालघर विभागीय उपाध्यक्ष किसनराव तारमळे यांनी दिली.
अंबरनाथ नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेशी भाजप दोन हात करणार! 

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये नगराध्यक्षपदासाठी राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे यांची नगराध्यक्षपदाची अडीच वर्षांची मुदत संपत असल्याने येत्या आठवड्यात नवीन नगराध्यक्षांची निवड होण्याची शक्‍यता आहे. भाजप नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहे, अशी माहिती भाजपचे ठाणे-पालघर विभागीय उपाध्यक्ष किसनराव तारमळे यांनी दिली. 

नगरपालिकेत 57 नगरसेवक असून, शिवसेनेचे सर्वाधिक 27 नगरसेवक आहेत. शिवसेना-भाजप यांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती; मात्र गेल्या वर्षी नगरपालिकेत शिवसेना-भाजप यांची युती झाली. शिवसेनेने भाजपला बांधकाम समिती सभापतिपदही दिले. 

शिवसेनेबरोबर सत्तेत असतानाही भाजपने नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरण्याचे ठरवले आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष, खासदार कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली जाईल. तेच उमेदवार ठरवतील, असेही तारमळे यांनी सांगितले. पालिकेत शिवसेना 27, भाजप 11, कॉंग्रेस आठ, राष्ट्रवादी सहा, मनसे दोन आणि अन्य असे पक्षीय बलाबल आहे. 

गेल्या काही वर्षांपासून नगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. नगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होऊ नये, यासाठी भाजप नगराध्यक्षपदासाठी वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीच्या रिंगणात उतरणार. 
- भरत फुलोरे, भाजप शहराध्यक्ष आणि नगरसेवक 

नगरपालिकेत उर्वरित अडीच वर्षांसाठी होणाऱ्या नगराध्यक्षपदासाठीची निवडणूक वरिष्ठांच्या नेतृत्वाखाली लढवणार आहे. 
- पूर्णिमा कबरे, शहर प्रभारी, माजी नगराध्यक्षा, अंबरनाथ 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com