सेनेच्या अंबादास दानवेंची हर्षवर्धन जाधवांच्या कन्नडमध्ये फिल्डिंग  

जिल्हा प्रमुख आमदास दानवेंच्या कार्यक्षेत्रात वाढ करून कन्नड तालुक्‍याची जबाबदारी दिल्याने आम्हाला दुप्पट बळ मिळाले आहे. तालुक्‍यातील सेनेच्या सर्व कार्यकर्त्यामध्ये उत्साह आहे.-केतन काजे ,तालुका प्रमुख
Danve-Jadhav.
Danve-Jadhav.

कन्नड :  कन्नड तालुक्‍याचे पूर्वीपासून शिवसेनेवर प्रेम राहिलेले आहे . याच तालुक्‍याने सेनेला दोन विधानसभा सदस्य दिलेले आहे. 2019 मध्येसुद्धा कन्नड तालुक्‍याचा आमदार हा शिवसेनेचाच असेल . सेनेचा उमेदवार जास्तीस्त जास्त मताधिक्‍याने कसा निवडून येईल एवढाच प्रयत्न आम्हाला करायचा आहे, असे शिवसेनेचे  जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी कन्नड येथे बोलताना सांगितले . 

कन्नड येथून हर्षवर्धन जाधव शिवसेनेतर्फे २०१४ मध्ये आमदार म्हणून निवडून आलेले होते . मराठा आरक्षणासाठी त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला होता . आता कन्नडमधून हर्षवर्धन जाधव अपक्ष लढविण्याच्या तयारीत आहेत . या पार्श्वभूमीवर नुकतेच पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या औरंगाबाद ग्रामीण जिल्हाप्रमुखांच्या कार्यक्षेत्रात वाढ करून अंबादास दानवे यांच्याकडे कन्नड विधानसभेची अधिकची जबाबदारी दिली आहे . 

जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी गेल्या आठवड्यात  कन्नड तालुक्‍याचा दौरा केला. या दौऱ्यात दानवे यांनी नाचनवेल ,चिंचोली , करंजखेड, पिशोर, चिकलठाण , कन्नड शहर, चापानेर व औराळा या जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी यांची भेट घेऊन चर्चा करून संघटन मजबूत करण्यासाठी मार्गदर्शन केले.

 पदाधिकाऱ्यांच्या भेटीच्या निमित्ताने आलेल्या अंबादास दानवेंनी विविध जिल्हा परिषद गटात भेटी दरम्यान रस्त्यात ठिकठिकाणी  थांबून शेतकऱ्यांशी चर्चा  केली व समस्या जाणून घेतल्या. शिवसेना कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिलेली आहे .शेतकऱ्यांना पिक विमा संदर्भातील व शेतकरी सन्मान योजनाबद्दल काही अडचणी असल्यास त्या सेनेच्या कार्यकर्त्यांना सांगाव्या त्या आम्ही प्राधान्याने सोडवू असे त्यांनी  या दौऱ्या दरम्यान सांगितले.

तीस जून रोजी करंजखेडा, चिंचोली नाचनवेल, पिशोर या गटातील नव्याने शाखाप्रमुख निवडण्यात येणार आहे , याबरोबरच ग्रामपंचयतील वार्ड नुसार सुद्धा नवीन शाखा प्रमुख नेमणार आहेत अशी माहिती दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com