शिवसेनाही सर्व जागा स्वबळावर लढण्यास तयार- अंबादास दानवे

 शिवसेनाही सर्व जागा स्वबळावर लढण्यास तयार- अंबादास दानवे

औरंगाबाद : आगामी महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसने शिवसेने सोबत येऊन महाविकास आघाडीत लढावे अशी आमची इच्छा आहे. पण कॉंग्रेसने स्वबळावर सर्व जागा लढण्याची तयारी केली असले तर शिवसेनाही स्वबळासाठी सज्ज असल्याचे आमदार तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी सरकारनामाशी बोलतांना सांगितले. आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेने सोबत न जाता स्वबळावर लढण्याची मागणी स्थानिक कॉंग्रेस नेते व पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली. मुंबईत आज झालेल्या बैठकीत थोरात यांनी देखील सर्व 115 जांगावर लढण्याची तयारी करा असे आदेश कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. 

या पार्श्‍वभूमीवर अंबादास दानवे यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली. दानवे म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले आहे. त्यानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अनेक ठिकाणी महाविकास आघाडी एकत्रितपणे लढली आहे. महापालिका निवडणुकीत देखील कॉंग्रेसने आमच्या सोबत यावे अशी आमची इच्छा आहे. पण कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी स्वबळावर लढण्याची भाषा सुरू केली आहे. तशी मागणी देखील त्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे केल्याची माहिती आहे. कॉंग्रेस सोबत आली तर आनंदच आहे, आम्ही त्यांचे स्वागत करू. पण याचा अर्थ शिवसेना स्वबळावर लढवू शकत नाही असा कुणी काढू नये. 

शिवसेनेची देखील 115 वॉर्डांमध्ये उमेदवार करण्याची तयारी आहे. अगदी मुस्लिमबहुल भागात देखील आमच्याकडे उमेदवार आहेत असा दावा देखील दानवे यांनी केला. शेवटी स्वबळावर लढायचे? की महाआघाडी करून एकत्रित याचा निर्णय तीन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते घेतील, तेव्हा वाट पहा असा सूचक इशारा देखील दानवे द्यायला विसरले नाहीत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com