सेलिब्रेशन म्हणून गरीबांना मिळाली कांद्याची भेट...अंबादास दानवेंची संवेदनशीलता...

गोरगरीब सर्वसामान्यांच्या अडीअडचणीला धावून जाणे त्यांना मदत करणे हीच शिकवण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हा शिवसैनिकांना दिली आहे 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या त्यांनी आखून दिलेल्या सूत्रानुसार आम्ही वाटचाल करत आहोत. वाढदिवसानिमित्त कांदे वाटपाची कल्पनादेखील यातूनच सुचली कांद्याचे भाव गगनाला भिडलेले असताना गोरगरीब जनतेला काही प्रमाणात का होईना दिलासा देण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न होता, असे अंबादास दानवे यांनी सरकारनामशी बोलताना सांगितले.
 सेलिब्रेशन म्हणून गरीबांना मिळाली कांद्याची भेट...अंबादास दानवेंची संवेदनशीलता...

औरंगाबाद : राजकीय नेत्यांचे वाढदिवस म्हटले की, तामझाम ,खाद्यपदार्थांची रेलचेल ,फटाक्‍यांची आतषबाजी आणि डीजेच्या तालावर नाचगाणे असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते . परंतु याला छेद देत शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी मात्र आपला वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला . सध्या कांद्याच्या भाववाढीने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे, नेमका हाच धागा पकडत दानवे यांनी शहरातील गरीब वस्तीमध्ये जाऊन चक्क दहा क्विंटल कांद्याचे वाटप केले. 

औरंगाबाद जालना - स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून निवडून आलेले शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांचा वाढदिवस नुकताच विविध सामाजिक कार्यक्रमांनी साजरा झाला. लहान मुलांना मोफत उपचार व औषधी पुरवठा करून तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करत त्यांनी हा वाढदिवस साजरा केला. त्याचबरोबर गोरगरिबांना पोटभर अन्न मिळावे म्हणून शिवभोजन गाड्याच्या माध्यमातून दहा रुपयात भरपेट जेवण देण्याची योजना देखील शहरात राबवली. 

आज दुसऱ्या दिवशीही दानवे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थकांनी अनोखा उपक्रम राबवत इतरांनाही प्रोत्साहित करण्याचे काम केले आहे .कांदा महाग झाल्याने सध्या सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे, हेच ओळखून दानवे यांच्या समर्थकांनी शहरातील गरीब वस्त्यांमध्ये जाऊन तब्बल दहा क्विंटल कांदे वाटप करत दिलासा देण्याचा प्रयत्न केला. 

सर्वसामान्य माणसाला मदत हीच शिकवण - दानवे 
गोरगरीब सर्वसामान्यांच्या अडीअडचणीला धावून जाणे त्यांना मदत करणे हीच शिकवण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हा शिवसैनिकांना दिली आहे 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या त्यांनी आखून दिलेल्या सूत्रानुसार आम्ही वाटचाल करत आहोत. वाढदिवसानिमित्त कांदे वाटपाची कल्पनादेखील यातूनच सुचली कांद्याचे भाव गगनाला भिडलेले असताना गोरगरीब जनतेला काही प्रमाणात का होईना दिलासा देण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न होता, असे अंबादास दानवे यांनी सरकारनामशी बोलताना सांगितले. 
 
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com