शिवसेनेचे हिंदुत्व भाजपसारखे शेळपट नाही - अंबादास दानवे

शिवसेनेचे हिंदुत्व भाजपसारखे शेळपट नाही - अंबादास दानवे

औरंगाबाद : येणाऱ्या महापालिका निवडणुकीत शिवसेना कुठल्या तोंडाने हिंदुत्वाची भूमिका घेऊन लोकांसमोर जाणार असा सवाल माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील मेळाव्यात केला. यावर शिवसेनेचे हिंदुत्व रस्त्यावर उतरून शत्रुशी दोन हात करणारे आहे, दंगलीच्या वेळी घरात शेपटी घालून बसणाऱ्या शेळपट भाजपसारखे नाही अशा जळजळीत शब्दात शिवसेनेचे आमदार तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी भाजपचा समाचार घेतला आहे. 

औरंगाबाद महापालिका निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर आली आहे. भाजप स्वबळावर तर शिवसेना महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढणार आहे. शिवसेनेने हिंदुत्व सोडले असा आरोप करत भाजपने प्रचाराला सुरुवात केली आहे. रविवारी मुंबईत झालेल्या भाजपच्या राज्यस्तरीय परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद महापालिकेचा उल्लेख करत तिथे महापौर भाजपचाच होणार असा दावा केला. शिवसेनेच्या हिंदुत्वावरही त्यांनी टीका केली. 

यासंदर्भात आमदार अंबादास दानवे यांनी सरकारनामाशी बोलताना भाजपला धारेवर धरले .अंबादास दानवे म्हणाले, शिवसेनेला हिंदुत्व शिकवण्याच्या भानगडीत फडणवीसांनी पडू नये .औरंगाबादचे संभाजीनगर करण्याची आठवण भाजपाला निवडणुकीच्या तोंडावर होत आहे. परंतु पाच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री असताना शिवसेनेने संभाजीनगरच्या नामकरणासाठी शेकडो निवेदन आणि आंदोलन केली. मात्र तेव्हा फडणवीसांनी मस्ती ची भाषा वापरत संभाजीनगरच्या विषयाला बगल दिली. आज मात्र त्यांना हिंदुत्व आणि संभाजीनगर आठवत आहे. 

आमच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित करण्याआधी शहरांमध्ये दंगल झाली तेव्हा घरात शेपटी घालून लपून बसलेल्या भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या नेभळट भूमिकेवर उत्तर द्यावे .शिवसेनेचे हिंदुत्व हे शेळपट नसून रस्त्यावर उतरून शत्रूंशी दोन हात करणारे , निधड्या छातीचे असल्याचेही अंबादास दानवे यांनी ठणकावून सांगितले. 

भाजपचा महापौर हे दिवास्वप्न 

देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद महापालिकेत भाजपचा महापौर होणार असा दावा केला आहे. परंतु त्यांचे हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही, ते दिवास्वप्नच ठरेल अशा शब्दात अंबादास दानवे यांनी फडणवीस यांची खिल्ली उडवली. भाजपाच्या मदतीशिवाय आम्ही उपमहापौर निवडून आणला, आता तुमच्याशिवाय महापालिकेत शिवसेनेचाच महापौर करून दाखवू असे आव्हान देखील अंबादास दानवे यांनी दिले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com