Amarsingh Unhappy over his own Statement About Bacchan Family | Sarkarnama

अमरसिंहांना वाटतोय बच्चन कुटुंबियांबद्दल बोलल्याचा खेद

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

समाजवादी पक्षाचे माजी नेते अमरसिंह यांनी ट्विटच्या माध्यमातून बिग बी अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबीयांबाबत स्वत: केलेल्या वक्तव्याबद्दल आज खेद व्यक्त केला

नवी दिल्ली  : समाजवादी पक्षाचे माजी नेते अमरसिंह यांनी ट्विटच्या माध्यमातून बिग बी अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबीयांबाबत स्वत: केलेल्या वक्तव्याबद्दल आज खेद व्यक्त केला. अमरसिंह यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे, ‘‘आज माझ्या वडिलांची पुण्यतिथी असून, याबाबत मला अमिताभ बच्चन यांचा मेसेज आला आहे. आता जीवनाच्या एका टप्प्यावर मी जीवन आणि मृत्यूशी झुंजतो आहे. अमितजी आणि त्यांच्या कुटुंबीयांबाबत मर्यादेपेक्षा अधिक बोलल्याबद्दल मला आज दु:ख होते आहे. देव त्या सर्वांना चांगले ठेवो.’’ 

तत्पूर्वी अमरसिंह यांनी २०१७ मध्ये एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमिताभ आणि जया बच्चन तसेच अभिषेक आणि ऐश्‍वर्या यांच्यातील तणावपूर्ण संबंधांबाबत जाहीर भाष्य केले होते. यानंतर त्यांचे बच्चन कुटुंबीयांशी मतभेद झाले होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख