amarsingh shivpal yadav bjp news | Sarkarnama

अमरसिंह यांच्या राजकीय मनसुब्यांना तडा

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

लखनौ : समाजवादी पक्षातून बाजूला करण्यात आल्याने नाराज झालेले ज्येष्ठ नेते शिवपाल यादव यांच्या हाती भाजपचे कमळ देण्यासाठी प्रयत्नशील असलेले बंडखोर नेते अमरसिंह यांच्या राजकीय मनसुब्यांना आज तडा गेला.

 अमरसिंह यांनी भाजप नेत्यांची बैठकीसाठी वेळही घेतली होती; पण ऐनवेळी शिवपाल यांनीच या बैठकीला दांडी मारल्याने ते तोंडघशी पडले. 

आपण भाजप नेत्यांशी बोलणी केली होती, त्यासाठी वेळही ठरवून घेतली होती; पण ऐनवेळी शिवपाल यांनी या बैठकीस येणे टाळल्याचे अमरसिंह यांनी नमूद केले. पत्रकारांनी अधिक प्रश्‍न विचारल्यानंतर शिवपाल येथे जवळच राहतात तुम्ही त्यांना विचारू शकता, असे सांगत त्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. 

समाजवादी पक्षाचे सर्वेसवा मुलायमसिंह यादव यांच्याप्रमाणेच पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने शिवपाल यादव नाराज होते. आपल्याकडे काही तरी वेगळी जबाबदारी सोपविली जाऊ शकते, माझ्याकडे फार काळ दुर्लक्ष करता येणार नाही, असे सूचक उद्‌गार शिवपाल यांनी माध्यमांशी बोलताना काढले होते.

 शिवपाल यांच्या मनातील खदखद ओळखून अमरसिंह यांनी त्यांना भाजपमध्ये आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. 
....... 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख