आजचा वाढदिवस : अमरसिंह पंडित, विधान परिषद सदस्य राष्ट्रवादी कॉंग्रेस. - amarsing pandit birthday | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

आजचा वाढदिवस : अमरसिंह पंडित, विधान परिषद सदस्य राष्ट्रवादी कॉंग्रेस.

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 31 मे 2018

माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांचे थोरले चिरंजीव असलेले अमरसिंह पंडित विधान परिषदेचे सदस्य तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आहेत. पंचायत समिती सभापतीपदापासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या अमरसिंह पंडित यांनी जिल्हा परिषद सदस्य तसेच 2004 मध्ये भाजपच्या उमेदवारीवर गेवराई मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले. त्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष, राज्य सहकारी बॅंकेचे संचालक म्हणूनही काम केले. सध्या ते मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सहचिटणीस असून चंपावती क्रीडा मंडळ, जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळ, जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळ या तीन संस्थांचे अध्यक्ष आहेत.

माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांचे थोरले चिरंजीव असलेले अमरसिंह पंडित विधान परिषदेचे सदस्य तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आहेत. पंचायत समिती सभापतीपदापासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या अमरसिंह पंडित यांनी जिल्हा परिषद सदस्य तसेच 2004 मध्ये भाजपच्या उमेदवारीवर गेवराई मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले. त्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष, राज्य सहकारी बॅंकेचे संचालक म्हणूनही काम केले. सध्या ते मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सहचिटणीस असून चंपावती क्रीडा मंडळ, जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळ, जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळ या तीन संस्थांचे अध्यक्ष आहेत. जिल्हा परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी काम केले. शेतकऱ्यांच्या अडचणी, मराठवाड्याचे सिंचन, कापसावरील बोंडआळीची समस्या तसेच विद्यार्थी शिष्यवृत्ती व वैद्यकपूर्व परीक्षेतील विभागनिहाय आरक्षण आदी प्रश्नांवर त्यांनी नेहमी सरकारला धारेवर धरले. सध्या ते विधीमंडळ अंदाज व विधीमंडळ लोकलेखा समितीचे सदस्य आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख