आजचा वाढदिवस : अमर साबळे, खासदार, राज्यसभा. - amar sabale mp | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : अमर साबळे, खासदार, राज्यसभा.

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

अमर साबळे हे भाजपचे राज्यसभा सदस्य आहेत. ते मूळचे बारामतीचे. मात्र, आता ते पिंपरी-चिंचवडकर झाले आहेत. दिवंगत भाजप नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे ते कट्टर समर्थक होते. राज्य व केंद्राच्या विविध 15 समित्यांवर ते आहेत. केकावली नावाचे साप्ताहिक ते वीस वर्षे बारामतीहून चालवीत होते. ते चालवताना पक्षाच्या विविध जबाबदाऱ्याही त्यांनी सांभाळल्या. गोपीनाथ मुंडे यांच्या रेणापूर आणि बीड या विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात निवडणुकीत त्यांचे प्रचारप्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. 2009 च्या विधानसभेला पिंपरीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

अमर साबळे हे भाजपचे राज्यसभा सदस्य आहेत. ते मूळचे बारामतीचे. मात्र, आता ते पिंपरी-चिंचवडकर झाले आहेत. दिवंगत भाजप नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे ते कट्टर समर्थक होते. राज्य व केंद्राच्या विविध 15 समित्यांवर ते आहेत. केकावली नावाचे साप्ताहिक ते वीस वर्षे बारामतीहून चालवीत होते. ते चालवताना पक्षाच्या विविध जबाबदाऱ्याही त्यांनी सांभाळल्या. गोपीनाथ मुंडे यांच्या रेणापूर आणि बीड या विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात निवडणुकीत त्यांचे प्रचारप्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. 2009 च्या विधानसभेला पिंपरीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतरही त्यांनी पक्षाचे काम दुप्पट उत्साहाने सुरू केले होते. त्याचीच पावती म्हणून त्यांना पक्षाने राज्यसभेवर घेतले आहे. खासदार झाल्यानंतरही त्यांच्यातील पत्रकार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्यातूनच त्यांनी अमरवाणी हे न्यूज पोर्टल सुरू केले आहे. स्वतःचे न्यूज पोर्टल असणारे ते एकमेव खासदार आहेत. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख