सरकार येईलच,पवारांच्या मार्गदर्शनामुळे कोणतीही चिंता नाही : अनिल पाटील

राज्यात 'महाशिवआघाडी'चे सरकार निश्‍चित स्थापन होईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार त्याबाबत निर्णय घेत आहेत. त्यामुळे आम्हाला कोणतीही चिंता नाही, पक्षनेत्यांच्या आदेशानुसार आपण मतदार संघात कामाला लागलो आहोत. असे प्रथमच निवडून आलेले अमळनेर मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी 'सरकारनामा'शी बोलतांना व्यक्त केले.
Amalner NCP MLA Confident About Sharad Pawar Will Succed in Forming the Govenment
Amalner NCP MLA Confident About Sharad Pawar Will Succed in Forming the Govenment

जळगाव : राज्यात 'महाशिवआघाडी'चे सरकार निश्‍चित स्थापन होईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार त्याबाबत निर्णय घेत आहेत. त्यामुळे आम्हाला कोणतीही चिंता नाही, पक्षनेत्यांच्या आदेशानुसार आपण मतदार संघात कामाला लागलो आहोत. असे प्रथमच निवडून आलेले अमळनेर मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी 'सरकारनामा'शी बोलतांना व्यक्त केले.

राज्यात सत्तास्थापनेचा तिढा निर्माण झाला आहे. राष्ट्रपती राजवटही लागू झालेली आहे.राज्यात काही आमदार प्रथमच निवडून आलेले आहेत. त्यांनी अद्याप विधीमंडळात आमदार म्हणून प्रवेश केलेला नाही, अशा आमदारासमोर अनेक प्रश्‍न निर्माण झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. जळगाव जिल्हयातील अमळनेर विधानसभा मतदार संघातील आमदार अनिल भाईदास पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे प्रथमच निवडून आले आहेत. 

याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ''राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे, तसेच सरकारस्थापनेचा जो प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्याबददल कोणतीही चिंता नाही, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आम्हाला मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागली असली तरी राज्यात लवकरच 'महाशिवआघाडी'चे सरकार येईलच याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे आम्ही निश्‍चिंत आहोत. आम्ही पक्ष नेत्यांच्या आदेशानुसार मतदार संघात कामे जनतेची कामे करीत आहोत. ओल्या दुष्काळामुळे अमळनेर मतदार संघातही मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे झालेले आहेत. त्यांना मदत मिळण्यासाठी आपण जिल्हाधिकाऱ्यांची लवकरच भेट घेणार आहोत."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com