alligation on bandatatya karadkar | Sarkarnama

वारकरी नेते बंडातात्या कऱ्हाडकर यांच्यावर षडयंत्राचा आरोप 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

मठाधिपतीपद सोडण्यासाठी मला मठाचे अध्यक्ष यशवंत दाजी माने यांनी दहा लाखांची ऑफर दिली होती. ती मी स्वीकारली नाही, त्यामुळे मठाचे विश्‍वस्त आणि बंडातात्या कऱ्हाडकर मला हटविण्यासाठी एकत्र आले आहेत, असा गौप्यस्फोट बाजीराव जगताप यांनी केला आहे. 

सातारा : मठाधिपतीपद सोडण्यासाठी मला मठाचे अध्यक्ष यशवंत दाजी माने यांनी दहा लाखांची ऑफर दिली होती. ती मी स्वीकारली नाही, त्यामुळे मठाचे विश्‍वस्त आणि बंडातात्या कऱ्हाडकर मला हटविण्यासाठी एकत्र आले आहेत, असा गौप्यस्फोट बाजीराव जगताप यांनी केला आहे. 

दरम्यान, मारूतीबुवा कऱ्हाडकर मठाचे विश्‍वस्त आणि बंडातात्या कऱ्हाडकर यांनी मठाची व वारकरी सांप्रदायाची बदनामी केली असून त्या दोघांनी मला बदनाम करण्याचे षडयंत्र आखले आहे, असा आरोप त्यांनी केला. 

मठाधिपती बाजीराव जगताप यांची निवड व्हावी, यासाठी त्यांच्या समर्थनार्थ कऱ्हाड शहरातून वारकरी व विविध गावच्या लोकांनी रॅली काढली होती. यानंतर बाजीराव जगताप यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले, मी मठाधिपती पद सोडावे, यासाठी मठाचे अध्यक्ष माने गुरूजी यांनी पंढरपुरात दहा लाखांची ऑफर दिली होती. ती मी न स्वीकारल्यानेच माझ्याविरोधात बंडातात्या कऱ्हाडकर यांना सोबत घेऊन दोघांनी मला बदनाम करण्याचे षडयंत्र आखले आहे. हे षडयंत्र अत्यंत घातक व वाईट आहे. विश्‍वस्तांनी जयवंतबुवा पिसाळ यांची मठाधिपती घोषणा केली असली तरी अद्यापही त्यांच्या मठाधिपतीपदाची कागदोपत्रांची पूर्तता झालेली नाही, याचेही पुरावे आहेत. त्याविरोधात आम्ही न्यायायात धाव घेतली आहे, असेही श्री. जगताप यांनी स्पष्ट केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख