alliance decission will be in delhi girhish mahajan | Sarkarnama

युतीचा निर्णय मुंबईत न झाल्यास दिल्लीत होईल : गिरीश महाजन 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

मुंबई : युतीचा निर्णय मुंबईत झाला नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीला जातील आणि तेथेच निर्णय होईल अशी माहीती भाजप नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज येथे दिली. 

राज्यात विधानसभेच्या 288 जागा असून, यामधील 88पैकी 70जागा निवडून आणू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी मागील विधानसभा निवडणुकीदरम्यान सांगितले होते आणि त्यानुसार काम करत विजय संपादन केला.

आता आमच्या पक्षात प्रवेशासाठी रीघ लागली आहे. आम्ही सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमच्याकडे विधानसभेच्या जागा आहेत. 10ते 15 जागा आमच्या पक्षात नव्याने प्रवेश करत असलेल्यांना निवडणुकीवेळी देऊ, असे सूतोवाच महाजन यांनी केले. 

दरम्यान, पक्षात प्रवेश करत असलेल्यांपैकी चार ते पाच जणच नवे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.युतीबाबतला अंतिम निर्णय येत्या दिवसात होईल. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख