युतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला "फिफ्टी -फिफ्टी' : मुनगंटीवार 

युतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला "फिफ्टी -फिफ्टी' : मुनगंटीवार 

मुंबई : शिवसेना- भाजपमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला फिफ्टी फिफ्टी ठरलेला आहे. मित्र पक्षांना जागा दिल्यानंतर समसमान जागा वाटप केले जाईल अशी माहीती राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे दिली. 

गेल्या काही दिवसापासून विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठीच्या जागा वाटपावरून मतभेद असल्याची चर्चा माध्यमात सुरू आहे. युतीच्या जागावाटपाबाबत मुंबईत पत्रकारांशी बोलताना मुनगंटीवार म्हणाले, की जागा वाटपाबाबत नाराजी ही केवळ एका व्यक्तीची असेल मात्र, ""मिले सूर मेरा तुम्हारा अशी आमची युती आहे.'' 

कॉंग्रेस राष्ट्रवादीचे नेते भाजपमध्ये येण्याच्या तयारीत आहेत पण, आम्हाला झोपलेल्यांना जागे करायचे नाही म्हणून आकडा आम्ही सांगत नाही. कॉंग्रेस राष्ट्रवादीमध्ये उणीव आहे म्हणून त्यांचे कार्यकर्ते भाजपमध्ये येत आहेत असा दावाही मुनगंटीवार यांनी यावेळी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com