'मुद्रा'च्या कर्जासाठी भाजप महिला पदाधिकाऱ्याने पैसे उकळल्याचा आरोप 

मुद्रा लोन देण्याचे आमिष दाखवून भारतीय जनता पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याने अनेक महिलांकडून पैसे घेऊन फसवणूक केल्याचा आरोप पीडित महिलेने केला असून, पैसे मागायला येणाऱ्या महिलांना मारहाण केल्याचाही आरोप केला आहे
'मुद्रा'च्या कर्जासाठी भाजप महिला पदाधिकाऱ्याने पैसे उकळल्याचा आरोप 

नाशिक : मुद्रा लोन देण्याचे आमिष दाखवून भारतीय जनता पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याने अनेक महिलांकडून पैसे घेऊन फसवणूक केल्याचा आरोप पीडित महिलेने केला असून, पैसे मागायला येणाऱ्या महिलांना मारहाण केल्याचाही आरोप केला आहे. यासंदर्भात पीडित महिला सीमा सेजल यांनी अंबड पोलिसांत भाजपच्या महिला पदाधिकारी उषा गवई (रा. राणेनगर) व त्यांचा मुलगा बंटी यांच्याविरोधात तक्रार दिली. 

जखमी सीमा सेजल त्यांच्या तक्रारीनुसार, उषा गवई यांनी मुद्रा योजनेचे कर्ज मिळवून देते, असे सांगून परिसरातील अनेक महिलांकडून दोन हजारांपासून हजारो रुपये जमा केले. फक्त ६० दिवसांत प्रत्येक महिलेला अडीच लाखांचे कर्ज देऊ, असे सांगितले. कर्जातील 20 हजार रुपये कमिशन द्यावे लागतील, असेही सांगितले. उषा गवई यांनी महिलांचा विश्‍वास संपादन करून त्यांच्याकडून पैसे गोळा केले. त्यानंतर पाच ते सहा महिने उलटूनही कर्ज मिळत नसल्याने महिलांनी दिलेले पैसे परत मागायला सुरवात केली. ज्या महिला पैसे परत मागतील, त्यांना उषा गवई व त्यांचा मुलगा बंटी दादागिरी व मारहाण करू लागले. यामुळे अनेक महिला घाबरून पैसे परत मागायला गेल्याच नाहीत. 

सीमा सेहल यांनाही मारहाण करण्यात आली. त्यांनी हिंमत करून अंबड पोलिसांत तक्रार केली. अंबड पोलिसांनी वरवर कारवाईचा देखावा केल्याने फसवणूक झालेल्या सर्व महिला आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे तक्रार करणार आहेत. याप्रकरणी भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष अश्‍विनी नाईक, रोहिणी नायडू, पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, देवयानी फरांदे यांच्याकडेही तक्रार करण्यात आली आहे. 

भाजप महिला पदाधिकाऱ्यांकडून आतापर्यंत कधीही कुणाला मारहाण झालेली नाही. हा प्रकार पक्षाला बदनाम करण्याचा असून, यासंदर्भात संबंधित महिला पदाधिकाऱ्याशी बोलून खुलासा करण्यात येणार आहे. 
- रोहिणी नायडू, महिला शहराध्यक्ष, भाजप 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com