आढळराव निवडून येवू नयेत म्हणून सगळेच बोलले! पण निवडून कुणाला द्यायचे हे सांगायचे विसरले..

केंदूर (ता.शिरूर) येथील सरपंच संगीता गावडे, उपसरपंच अभिजित साकोरे, पंचायत समिती सदस्या सविता प-हाड यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायत बाजार गाळे, सुक्रेवाडी अंगणवाडी इमारत व विविध रस्त्यांची एकुण १० कोटींच्या कामाचे उद्घाटन व भूमिपुजन कार्यक्रम संपन्न झाला.जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूका झाल्यानंतर दिवंगत खासदार बापूसाहेब थिटे यांच्या गावात पहिलीच जाहिर सभा होत असताना यात भाजपा सरकार, खासदार शिवाजीराव आढळराव यांचेवर सगळेच तोंडसुख घेणार हे निश्चित ठरलेले होते आणि घडलेही तसेच.
Dilip Walse - Shivajirao Adhalrao- Devdatta Nikam-Potaprao Gavde
Dilip Walse - Shivajirao Adhalrao- Devdatta Nikam-Potaprao Gavde

शिक्रापूर : यांनी एसईझेड घालविले... विमानतळ घालविले... यांनी पुणे-नाशिक रेल्वे पाबळ-केंदूर सोडून दुसरीकडून वळवली...आणि हे फक्त बोलतात काहीच करीत नाहीत.... असा खासदार शिवाजीराव आढळरावांच्या विरोधात एकमुखी सुर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे आणि अगदी माजी विधानसभाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केंदूर येथे शुक्रवारी (दि.१४) जाहिरपणे आळवला. मात्र लोकसभा निवडणुका तोंडावर आलेली असताना आणि मागील लोकसभा निवडणूकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार देवदत्त निकम हे समोर उपस्थित असताना आढळरावांना पर्याय कोण याबद्दल कुणालाच बोलता आले नाही. 

अर्थात या मतदार संघात तब्बल चौदा वर्षे खासदारकीसाठी सक्षम उमेदवार नसल्याची आगतीकता नेमकी कशामुळे याचे उत्तर अजुनही गुलदस्त्यातच असल्याचे या निमित्ताने उघड झाले.  केंदूर (ता.शिरूर) येथील सरपंच संगीता गावडे, उपसरपंच अभिजित साकोरे, पंचायत समिती सदस्या सविता प-हाड यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायत बाजार गाळे, सुक्रेवाडी अंगणवाडी इमारत व विविध रस्त्यांची एकुण १० कोटींच्या कामाचे उद्घाटन व भूमिपुजन कार्यक्रम संपन्न झाला.

जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूका झाल्यानंतर दिवंगत खासदार बापूसाहेब थिटे यांच्या गावात पहिलीच जाहिर सभा होत असताना यात भाजपा सरकार, खासदार शिवाजीराव आढळराव यांचेवर सगळेच तोंडसुख घेणार हे निश्चित ठरलेले होते आणि घडलेही तसेच. 

यावेळी जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे यांनी "आता खासदार कुठे आहेत..?" असे म्हणत राजकीय वक्तव्यांना तोंड फोडले आणि त्याचीच री ओढत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी "वळसे पाटलांना आवडत नाही तरीही बोलतो.." असे म्हणत थेट खासदार आढळराव यांनाच आव्हान द्यायाला सुरवात केली.

ते म्हणाले, ''खासदार केवळ श्रेयाची लढाई लढतात. मागील वेळी आमचे सरकार दोन्हीकडे असताना आम्ही केलेल्या विकासकामांचे श्रेय ते खासदार म्हणून घ्यायचे; तर आता त्यांचे सरकार आहे तरीही त्यांचेच सरकार असल्याचे सांगत वळसे पाटील साहेबांच्या कामांचे श्रेयही तेच घेत राहतात." अर्थात प्रत्येक गावात ५० लाखांचा निधी दिल्याचे ते नेहमी सांगतात मग आता गावनिहाय त्यांनी प्रत्येक गावाची ५० लाखांची आकडेवारी जाहिर करण्याचे आव्हान त्यांनी यावेळी दिले आणि आता अशी फसवणूक पुढील निवडणूकीत चालणार नसल्याचेही सांगितले. 

दरम्यान याच वेळी बोलताना पोपटराव गावडे म्हणाले, "पवार साहेबांनी पूर्वी पुणे-नाशिक रेल्वेचा सर्व्हे केला होता तो पाबळ-केंदूर मार्गे होता. मात्र, रेल्वे या भागातून तिकडे नेली आणि विमानतळ आणि एसईझेड झाले तर रक्त सांडेन, पण प्रकल्प होवू देणार नाही, असे म्हणणारे खासदार पुन्हा निवडून येवू नयेत, अशीच दक्षता आपण सर्वांनी घ्यायला हवी."
 
दरम्यान एरवी संयमी समजले जाणारे माजी विधानसभाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची कालच्या सभेत चांगलीच भट्टी जमून आली होती. त्यांनी आपल्या भाषणाची सुरवातच अशी केली की, जनतेना अच्छे दिनचे स्वप्न दाखविणा-या मोदी, मुख्यमंत्री आणि खासदार यांना आता आपण प्रत्येकाने प्रश्न विचारायलाच हवेत. बोला! डिजेल-पेट्रोलचे भाव कमी झाले..?, तुमच्या प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा झाले..?, संपूर्ण कर्जमाफी झाली..?, आरक्षणाचा शब्द दिला होता तो पूर्ण केला..? शेतमालाला भाव मिळू लागले..? एवढे म्हणून पुढे ते एका सुरात म्हणाले सांगा आता! खरंच तुम्हाला अच्छे दिन आले..? या प्रत्येक प्रश्नावर जोरदारपणे नकारात्मक उत्तरे घेत खुललेल्या भाषणात वळसे पाटलांनी खासदार आढळराव यांचे नाव टाळत ते कसे या भागासाठी लायक नाहीत याचे पूर्ण उत्तर उपस्थितांना दिले. 

मात्र त्यांच्या विरोधात पर्याय काय आणि आपण श्रेष्ठी असलेल्या राष्ट्रवादीतून आता तरी एखादा पर्याय पुढे येतोय हे सुध्दा त्यांनी सांगितले नाही. अर्थात हे सर्व होताना मागील लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादीचे तरुण-तडफदार उमेदवार सभापती देवदत्त निकम यांचेपुढेच हे सर्व होताना मात्र राष्ट्रवादीची विधानसभेची तयारी होतेय, पण शिरुर लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारीची कुठलीच तयारी नसल्याचेही या निमित्ताने सर्वांच्या भाषणात निष्पन्न झाले आणि राष्ट्रवादीची ही शिरुर लोकसभा मतदार संघातील आगतिकताही या निमित्ताने उघड झाली.      

निकमांना ताकद का दिली जात नाही..?
खरे तर देवदत्त निकम यांनी मागील निवडणूकीत अगदी कमी दिवसात जोरदार आव्हान देत स्वत:चे उत्तम वातावरण व आव्हान निर्माण केले होते. पुढच्या काळात मोदींच्या लाटेचा फायदा खासदार शिवाजीराव आढळराव यांना झाल्याचे जगजाहिर आहे. मात्र, गेल्या चार वर्षात पुन्हा निकमांना प्रोजेक्ट केले असते तर नक्कीच राष्ट्रवादीचा एक खासदार हमखास वाढला असता मात्र हीच ताकद निकमांना अद्यापही का दिली जात नाही हेच समजत नाही. कारण या संपूर्ण कार्यक्रमात निकमांना खरे तर बोलायला द्यायला हवेच होते अशी कुजबुज उपस्थितांमध्ये होतीच. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com