उद्धव ठाकरेंना कोणी खोटं ठरवत असेल तर ते सहन करणार नाही : गुलाबराव पाटील 

all shivsena mla gave rights fo udhav thackrey about form government gualabrao patil
all shivsena mla gave rights fo udhav thackrey about form government gualabrao patil

जळगाव : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत आहे. त्यांची खोली हे आमच्या शिवसैनिकांचे मंदिर आहे. त्या ठिकाणी झालेल्या चर्चेत आश्‍वासन देवून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जर कोणी खोटं ठरवित असेल तर आम्ही ते सहन करणार नाही असा इशारा शिवसेनेचे फायरब्रॅंड नेते गुलाबराव पाटील यांनी भाजपला दिला आहे. 

आम्ही सर्व आमदारांनी एका ओळीत सरकार स्थापनेचे अधिकार त्यांना दिले आहेत. ते राज्यातील शेतकरी आणि जनतेच्या हिताचाच योग्य निर्णय घेतील याची आम्हाला खात्री आहे असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. 

राज्यात सत्तेचा तिढा निर्माण झाला आहे. राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसची "महाशिवआघाडी'राज्यात सत्तेवर येण्याचे संकेत आहेत. त्या दृष्टीने चर्चाही सुरू आहे. याबाबत शिवसेनेचे उपनेते व राज्याचे माजी सहकारमंत्री व जळगाव ग्रामीण मतदार संघाचे आमदार गुलाबराव पाटील यांच्याशी "सरकारनामा'ने संपर्क साधला असता. 

पाटील म्हणाले, "" भाजपसोबत जे ठठरलं त्यानुसारच उद्धव ठाकरे यांनी मागितलं. परंतु ते मान्य न करता, त्यांनाच खोटं ठरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. शब्दाला जागणारे आम्ही शिवसैनिक आहोत. त्यामुळे आम्ही सर्व आमदारही ते कस सहन करू.आम्ही सर्व आमदारांनी एकमुखाने सरकार स्थापनेबाबत त्यांना अधिकार दिले आहेत. 

राज्यात "महाशिवआघाडी'सत्ता येण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री होवून राज्यात एक चांगले सरकार येईल याचा आपल्याला विश्‍वास आहे. नवीन सरकारच्या काळात जिल्ह्यात सिंचन प्रकल्प पूर्ण होण्याकडेच आमचे लक्ष राहणार आहे. जिल्ह्यातील हे प्रकल्प पूर्ण झाल्यास सिंचनाचा बॅकलॉग पूर्ण होवून विकास होईल हे निश्‍चित असेही पाटील म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com