प्रभाकर देशमुखांसाठी सर्वपक्षीयांचा फेव्हिकाॅल का मजबूत जोड!

प्रभाकर देशमुखांसाठी सर्वपक्षीयांचा फेव्हिकाॅल का मजबूत जोड!

वडूज : अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांच्या मागे सगळे पक्ष आहेत की नाहीत, या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला. आज वडूज येथे पत्रकार परिषद घेऊन सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी देशमुख हेच आमचे उमेदवार आहेत म्हणून घोषित केले.

या पत्रकार परिषदेत माजी आमदार प्रभाकर घार्गे (राष्ट्रवादी), माजी आमदार दिलीप येळगावकर (भाजप), अनिल देसाई (भाजप), रणजित देशमुख (शिवसेना), अनिल पवार (स्वाभिमानी शेतकरी संघटना), मामुशेठ विरकर (राष्ट्रीय समाज पक्ष), संदीप पोळ (राष्ट्रवादी काँग्रेस), माजी सभापती संदिप मांडवे, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे, अशोक गोडसे, बबनराव विरकर, एम के. भोसले (काँग्रेस), विवेक देशमुख (पं. स. सदस्य), अशोक बैले, सुभाष नरळे, सभापती रमेश पाटोळे, शिवाजीराव सर्वगोड, सुनिल पोळ, डाॅ. महादेव कापसे, विश्वंभर बाबर, बाळासाहेब सावंत, पृथ्वीराज गोडसे, दिलीप तुपे, सत्यवान कमाने, सुनील नेटके, साहेबराव शिंदे, रमेश शिंदे, राजेंद्र देशमुख, विष्णूपंत अवघडे, बाबासो माने, संदीप महाडीक, नाना पुजारी, विकास पासलकर, तानाजी मगर, अरुण कट्टे, डाॅ. विजय कुलकर्णी, रत्नाकर मोकाशी, राजूभाई मुलाणी आदी मान्यवर या पत्रकार परिषदेत उपस्थित होते.

माण-खटावला लागलेली राजकीय किड मुळासकट काढुन टाकायची हे या मतदार संघातील आमचं ठरलंय टिम ने पक्क ठरवल आहे. कोणत्याही परिस्थितीत हे बांडगुळ उखडून टाकायचंच असा निर्धार या टीमने केला आहे. आमचं ठरलंय टीम ही फेविकॉल का मजबूत जोड है टूटेगा नहीं, असा विश्वास दिला.

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रभाकर देशमुख यांना भरघोस मताने निवडून आणून मतदार संघात परिवर्तन घडविणारच असा विश्वास या टीमने व्यक्त केला. या टिमच्या प्रमुखांच्या जोशपुर्ण वक्तव्यांनी कार्यकर्त्यांच्यात उत्साह संचारला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com