all opponents were with me sometime, says vikhe | Sarkarnama

`सगळे आपल्या मांडवाखालून गेलेत, काळजी नसावी`

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

श्रीरामपूर : विखे घराणे नगर जिल्ह्यांतील इतर तालुक्यांवर राजकीय आक्रमण करत असल्याच्या टिकेला माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिले असून विखे कुटुंबाला संघर्ष नवा नसल्याचा दावा त्यांनी केला. त्यांच्या या दाव्यामुळे विखे यांचे इतर तालुक्यांवरील `आक्रमण` सुरूच राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 

कोणाला आपले अतिक्रमण वाटत असेल तर त्यांनी आपले आक्रमण अजून पाहिलेले नाही. या तालुक्याचे राजकारण आपल्याला नवीन नाही. सगळे आपल्या मांडवाखालून गेले आहेत. ज्यांना अतिक्रमण वाटते ते आपले जुने लाभार्थी आहेत, त्यांचे काय करायचे ते माझ्यावर सोपवा, असेही त्यांनी सुनावले.

संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी विखेंनी ही भूमिका स्पष्ट केली. दिवंगत नेते गोविंदराव आदिक, माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्याशी झालेल्या  राजकीय संघर्षाची आठवण त्यांनी यानिमित्त काढली. पण तो व्यक्तीगत पातळीवर असल्याचेही स्पष्ट केले. दिवंगत जयंतराव ससाणे यांच्यासोबत घनिष्ट संबंध होते. भास्करराव गलांडे यांच्यापासून विखे कुटुंबियांचा श्रीरामपूरशी संबंध असल्याचे त्यांनी नमूद केले.

बाळासाहेब विखे पाटील यांनी खंडकरी शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. वकिलांचे पैसे दिले. त्यांना कधीही आपण येथे अतिक्रमण करत आहेत, असे वाटले नाही. मुळा-प्रवरा वीज संस्थेची वाताहत झाली. चांगली संस्था उद्ध्वस्त झाली. त्यावेळी पुष्कळ आरोप झाले. मात्र, मुळा-प्रवरा कामगारांचे सुतगिरणी, हरेगाव कारखान्यातील कामगारांसारखे हाल होवू दिले नाही. त्यांच्या पाठीशी उभे राहून १०० कोटी रुपये वाटले. समन्यायी पाणी वाटपामुळे वाद निर्माण होणार आहे. निळवंडेचे पाणी त्या भागातील लाभक्षेत्राला दिल्यानंतर पाण्याची कमरता भासेल. पश्चिम वाहिन्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविले पाहिजे. भंडारदरा धरणाच्या वर आणखी एका छोट्या धरणाची निर्मित करावी लागेल, असे त्यांनी या वेळी सांगितले.

साखर कामगार हॉस्पिटल, विखे फाऊंडेशन, मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून आधुनिक रुग्णालय उभे करता येईल. यासंदर्भात अविनाश आपटे यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली अहे. आयुष्यमान भारत योजनेशी साखर कामगार हॉस्पिटल जोडल्यास पाच ते २५ लाखांपर्यंतच्या उपचाराची सोय याठिकाणी होवू शकेल, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख