टिळेकरांच्या विजयासाठी भैरवनाथ मंदिरात महायुतीचा संकल्प

टिळेकरांच्या विजयासाठी भैरवनाथ मंदिरात महायुतीचा संकल्प

मांजरी : महायुतीचे उमेदवार आमदार योगेश टिळेकर यांच्या विजयासाठी भाजप सेनेसह घटक पक्षातील सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते एकवटले आहेत. हडपसर येथील भैरवनाथ मंदिरात सर्वांनी एकत्र येत याहीवेळी टिळेकर यांनाच मताधिक्य मिळवून देण्याचा संकल्प केला.

भाजपा, शिवसेना, आरपीआय, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम व रयत क्रांती महायुतीचे उमेदवार आमदार योगेश टिळेकर यांच्या प्रचाराची सुरुवात हडपसर गावातील भैरवनाथाचे दर्शन घेऊन झाली. दरम्यान रविवारचे औचित्य साधून टिळेकर यांनी  ग्लायडिंग सेंटरवर जात व्यायामासाठी येणारे मतदार व नागरिकांच्या भेटी घेऊन कमळ चिन्हाला मतदानाचे आवाहन केले. गांधीचौक, हडपसर गाव, ससाणेनगर, काळेपडळ, चिंतामणीनगर आदी परिसरातील मतदारांचीही त्यांनी भेट घेतली.

नगरसेवक मारुती तुपे, प्रमोद भानगिरे, उज्वला जंगले, माजी नगरसेवक विजय देशमुख, विजया वाडकर, हडपसर शिवसेना विभाग प्रमुख तानाजी लोणकर, भाजपा ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विकास रासकर, समिर तुपे, भूषण तुपे, माऊली कुडले, महेंद्र बनकर, सविता हिंगणे, संकेत झेंडे, संतोष खरात आदी पदाधिकाऱ्यांसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

उमेदवार टिळेकर म्हणाले, "मतदारसंघातील सर्व समाज घटकांच्या उन्नतीसाठी मी काम केले आहे. भौगोलिक विकास साधण्यात नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले आहे. त्यांच्या स्वप्नातील हडपसर मतदारसंघ घडविण्यासाठी मतदार मला निश्चितपणे पुन्हा एकदा संधी देतील, यावर माझा ठाम विश्वास आहे.' 

नगरसेवक मारुती तुपे म्हणाले, "हडपसर मतदारसंघात कधीच झाली नाही एवढी विकास कामे आमदार टिळेकर यांच्या माध्यमातून पाचच वर्षात  झाली आहेत. मेट्रो, ससाणेनगर अंडरपास व कात्रज-कोंढवा रस्त्याचा प्रश्न मार्गी लावून येथील पन्नास वर्षे रखडलेल्या वाहतुकीला दिशा देण्याचे काम झाले आहे. हा विकास परिपूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा मतदारांनी योगेश टिळेकरांच्या मागे आत्मविश्वासाने उभे राहावे.``

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com