शपथविधीला सोनिया गांधी आणि राज ठाकरे येणार का याकडे सर्वांच्या नजरा

शिवाजी पार्कवर आज सायंकाळी 6.40 ला शपथविधीशपथविधी सोहळ्यास एक लाख शिवसैनिक येणारराज ठाकरे यांना सोहळ्याचे निमंत्रणआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना निमंत्रणपंजाब, बंगाल, बिहार, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रणसोनिया गांधी, एम.के.स्टॅलिन, अखिलेश यादव यांनाही बोलावणे
soniya_gandhi_raj_thakre_
soniya_gandhi_raj_thakre_



मुंबई  : राज्यात विधानसभा निकालानंतर तब्बल महिनाभर चाललेल्या राजकीय घडामोडींनंतर मंगळवारी महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे निश्‍चित झाले. यानुसार महाविकास आघाडीचे नेते, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज गुरुवारी  मुख्यमंत्री म्हणून   शिवाजी पार्कवर सायंकाळी 6.40 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. सुमारे एक लाख लोक या सोहळ्याला हजेरी लावतील असे समजते .

या शपथविधीला काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी निमरण तर दिलेच आहे . पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही सोनिया गांधी यांना फोन करून येण्याबाबत निमंत्रण दिले आहे . शिवसेनेतर्फेही सोनिया गांधी यांना निमंत्रण देण्यात आले आहे.

  ठाकरे घराण्यातील पहिलाच व्यक्ती मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याने ठाकरे कुटुंबीयांसह मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनादेखील सोहळ्याचे निमंत्रण दिले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि नियोजित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच राज यांना हे निमंत्रण दिल्याची माहिती शिवसेना नेत्यांनी दिली आहे.  आता शिवाजी पार्कपासून हाकेच्या अंतरावर राहणारे राज ठाकरे शपथविधीला हजर राहतात का याकडे सर्वांच्या नजरा खिळलेल्या आहेत .

  दिमाखदार आणि जंगी शपथविधी सोहळ्याचा संदेश देशभरात जावा यासाठी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही उद्धव ठाकरे यांनी निमंत्रित केले आहे. यात कॅप्टन अमरजितसिंग (पंजाब), ममता बॅनर्जी (प.बंगाल), नितीशकुमार (बिहार), अरविंद केजरीवाल (दिल्ली), अशोक गेहलोत (राजस्थान), कमलनाथ (मध्य प्रदेश), भूपेश बघेल (छत्तीसगड) यांचा समावेश आहे; तर कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह ज्येष्ठ कॉंग्रेस नेते अहमद पटेल, मल्लिकार्जून खर्गे, सी. वेणूगोपाल, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. नव्या महाविकास आघाडीचे शिल्पकार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण राहणार असून, देशभरात भाजपविरोधी राजकारणाची दिशा या महाविकास आघाडीने आखून दिल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.

 या सोहळ्याची जय्यत तयारी केली असून, राज्यभरातून एक लाख शिवसैनिक येणार आहेत. शिवाय देशभरातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राजकीय नेते, चित्रपटसृष्टीतील कलाकारांना निमंत्रण देण्यात आले आहे. राज्यातील शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनादेखील सोहळ्यासाठी बोलावण्यात आले आहे.

शपथविधी सोहळ्यासाठी शिवाजी पार्कवर विस्तीर्ण व्यासपीठ उभारण्यात येत असून, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधिस्थळावर फुलांची सजावट केली आहे. राज्यातून सुमारे एक लाख शिवसैनिक येण्यासाठीचे नियोजन जिल्हा पातळीवरून केले आहे. शपथविधी सोहळ्यादरम्यान मराठी संस्कृतीची परंपरा सांभाळत विविध कला सादर करण्यासाठी सामाजिक कालमंचला सोहळ्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. शपथविधी सोहळा सायंकाळी होणार असल्याने रोषणाईने शिवाजी पार्क सजवण्याची तयारी सुरू आहे.



शिवसेना पक्षप्रमुख आणि महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीसाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील तब्बल 400 शेतकऱ्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच राज्यातील अनेक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनादेखील निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

याबाबत शिवसेनेचे नेते आणि आमदार एकनाथ शिंदे म्हणाले की, या शपथविधीसाठी शेतकऱ्यांसह कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे, तर कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, आम्ही शपथविधीसाठी विविध राज्यांमधील कॉंग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना बोलावले आहे. तसेच द्रमुक पक्षाचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन, तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनादेखील निमंत्रण पाठवण्यात आले आहे.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com