खोबरं घालते किसून, शिवाजीराव आले फोर्च्युनरमध्ये बसून! 

विधानसभा निवडणुकीत यश मिळवू न शकलेले नेते सध्या काय करतात? 'सरकारनामा'ने राहुरीचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा घेतलेला वृत्तांत.
alkatai kardile poetry on shivajirao kardile
alkatai kardile poetry on shivajirao kardile

नगर : सध्या आमदारपद नसलेतरी शिवाजीराव कर्डिले यांच्या मागील कार्यकर्त्यांचे मोहळ हटलेले नाही. काही काम असो किंवा नसो भेटायला येणाऱ्यांची संख्या खुपशी कमी झालेली नाही, तसेच कर्डिले कुटुंबियांतील कार्यक्रमाची क्रेझ तशीच आहे.

'दूधवाल्यांचा नेता' म्हणून कर्डिले यांची ओळख आहे. विवाह समारंभाच्या पत्रिकांचा ढीग पूर्वीप्राणेच आहे. एवढेच नव्हे, तर पत्रिकांवर प्रेषक म्हणून त्यांचे नाव येतच आहे. गेल्या पंचवीस वर्षांची आमदार म्हणण्याची सवय लोकांच्या अंगवळणी पडली आहे. सध्याही कर्डिले नित्यनियमाने सर्वांच्या लग्नाला उपस्थिती लावत आहेत. लग्न तिथी असल्यानंतर दिवसभर प्रत्येक लग्नाला हजेरी लावतात. नवरदेव-नवरीसोबत फोटोसेशन करतात. सकाळी दशक्रिया विधीसाठी उपस्थिती पूर्वीप्रमाणे सुरूच आहे.

शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय यांचा जनसंपर्क पुर्वीप्रमाणेच सुरू आहे. ज्या कार्यक्रमांना शिवाजीराव कर्डिले यांना जाणे शक्य नसते, तेथे अक्षय यांची उपस्थिती हमखास असते. पंचक्रोशितील ग्रामस्थही सर्व कार्यक्रमांना या कुटुंबाला निमंत्रण देण्याचे विसरत नाहीत. वडील सध्या पदावर नसले, तरी त्याचे शल्य त्यांच्या बोलण्यातून जाणवत नाही. राजकारणात हे सुरूच असते, असे म्हणून ते युवकांशी संवाद साधतात.

तो उखाना अलकाताईंनी घेतलाच

कर्डिले यांच्या बुऱ्हाणनगर येथील घरी आज हळदीकुंकवाचा कार्यक्रम झाला. कर्डिले यांच्या सौभाग्यवती अलकाताई कर्डिले या महिलांचे स्वागत करण्यात गुंग होत्या. दरवर्षी असा कार्यक्रम होतो. यंदाही झालेल्या कार्यक्रमास तितकीच गर्दी होती. अलकाताईंनी घेतलेला उखाना आज विशेष चर्चेचा ठरला.
अलकाताईं उखाना घेताना म्हणाल्या,

महादेवाच्या पिंडीला
नागोबाचा वेढा
शिवाजीरावांचा अन माझा
जन्माचा जोडा

असे म्हणताच उपस्थितांनी उत्साहाने दाद दिली. त्यानंतर उपस्थित महिलांनी फोर्च्युनरच्या उखान्याची आठवण करून देऊन तो उखाना घ्यायला लावला. अलकाताई म्हणाल्या, 

मुंबईचा बटाटा
पुण्याचा लसून
खोबरं घालते किसून 
शिवाजीराव आले फोर्च्युनरमध्ये बसून
तर शब्द देते हसून

या उखान्याला महिलांनी प्रचंड दाद दिली. हा कार्यक्रम रंगत जाऊन शेकडो महिलांनी कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com