akshaykumar in kolhapur | Sarkarnama

अक्षयकुमारने जिंकली मराठी मने! 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 2 मे 2017

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अक्षयकुमारच्या "भारत के वीर' ऍप साठी लाख रुपयांची मदत दिली. सीमेवर लढणाऱ्या लाखो सैनिकांच्या मागे देशातील सव्वाशे करोड जनता असल्याचे आपण दाखवून देवू असेही अक्षयकुमारने सांगून पुन्हा एकदा टाळ्या आणि शिट्या घेतल्या. 

कोल्हापूर : इनशर्ट केलेला ब्लॅक ड्रेस, हातात काळा "गॉगल' घेऊनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरच लीवूडचा खिलाडी अक्षयकुमारची एन्ट्री "जनगान' उद्यानात झाली. त्याला पाहण्यासाठी तासभर कडक उन्हात थांबलेल्या चाहत्यांना त्याने हात उंचावून पोज दिली आणि एकच जल्लोष झाला! 

आमदार-खासदार, पोलिस अधिकाऱ्यांच्या गराड्यातून अक्षयकुमार ध्वजस्तंभाजवळ असलेल्या छोट्या व्यासपीठावर आला. तेथे तिरंगी फुगे आकाशात सोडण्यात आले. राष्ट्रगीत आणि सलामीने देशातील दुसरा आणि राज्यातील पहिल्या क्रमांकाचा असलेल्या 303 फूट उंच ध्वजाचे अनावरण झाल्याचे जाहीर झाले. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अक्षयकुमार येताच जमलेल्या रसिकांनी शिट्या टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे जल्लोषी स्वागत केले. 

सुरवातीलाच "छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शाहू महाराज की जय' अशा घोषणा देवून अक्षयकुमार म्हणाला, "मी पहिल्यांदाच कोल्हापुरात आलो आहे. मी मराठीत बोलणार आहे. काय चूक झाली तर समजून घ्या. मी कोण आहे, या पेक्षा मला महाराष्ट्रदिनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्याशेजारी बसण्याचा मान मिळाला यात आनंद आहे. मी महाष्ट्रीयन नाही पंजाबी आहे. तरीही मला 303 फूट उंचीच्या झेंड्याच्या अनावरणासाठी बोलविले. या झेंड्यामुळे देशभक्ती दिसून येते. मला खूप आनंद होतो की फक्त झेंडा नसून तेथे गार्डनही आहे. कोल्हापूरच्या पर्यटनासाठी झेंडा महत्त्वाचा ठरेल. झेंड्यामुळे कोल्हापूर "टुरिझम स्पॉट' बनेल. ' 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख