Akshay Mundada Jaydatta kshirsagar come togather | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

अहमदनगर जिल्ह्यात 5 वाजे पर्यंत 62.86% मतदान
सिंधुदुर्गात सरासरी 60 टक्के मतदान
पिंपरी चिंचवडला सायंकाळी पाच वाजेपर्यंत झाले सरासरी ४८.३७ टक्के मतदान.
बारामतीत संध्याकाळी पाच पर्यंत 64 टक्के मतदानाची नोंद
जालना जिल्हा दुपारी 3-00 पर्यंत 50.29 टक्के मतदान
परभणी जिल्ह्यात दु. ३ पर्यंत 47.53 टक्के मतदान
पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये दुपारी 3.00 पर्यंत 38.93% मतदान
जळगाव जिल्ह्यात दुपारी 3.00 वाजेपर्यंत 39.96% मतदान
बीड परळी - दुपारी ३ पर्यंत ४७.१८ टक्के मतदान
नाशिकला दुपारी ३ पर्यंत ४५ टक्के मतदान
ठाणे जिल्हा : दुपारी 3.00 वाजेपर्यंत 35.50 टक्के मतदान
हडपसर मतदार संघातून दुपारी तीन वाजेपर्यंत 41.16 टक्के मतदान

जयदत्त अण्णांना विकासात तर विरोधकांना घर फोडण्यात इंटरेस्ट : अक्षय मुंदडा

सरकारनामा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

बीड : शाश्‍वत विकास म्हणून बीड कडे पाहिले जाते. आम्हा तरुणांना जयदत्त क्षीरसागर हे विकासाचे मॉडेल म्हणून सर्वात जास्त आवडतात. त्यांनी अनेक विकासाची कामे केली. विरोधकांना फक्त दुसऱ्यांचे घर फोडणे यातच इंट्रेस्ट वाटतो असे प्रतिपादन अक्षय मुंदडा यांनी केले.

बीड : शाश्‍वत विकास म्हणून बीड कडे पाहिले जाते. आम्हा तरुणांना जयदत्त क्षीरसागर हे विकासाचे मॉडेल म्हणून सर्वात जास्त आवडतात. त्यांनी अनेक विकासाची कामे केली. विरोधकांना फक्त दुसऱ्यांचे घर फोडणे यातच इंट्रेस्ट वाटतो असे प्रतिपादन अक्षय मुंदडा यांनी केले.

बीडमधील शिवसेना व महायुतीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत अक्षय मुंदडा यांनी राष्ट्रवादीवर टिकास्त्र सोडले. मोमीनपुरा भागात झालेल्या सभेला उमेदवार जयदत्त क्षीरसागर, मोईन मास्टर, मोमीन इरफान, मोमीन हमीदभाई, जलील पठाण, सादिक उजमा, भगीरथ बियाणी उपस्थित होते.

अक्षय मुंदडा म्हणाले, सामान्य माणसाला ताकद देऊन त्याला उभे करण्याची धमक जयदत्त क्षीरसागर यांच्यात आहे. त्यांनी आतापर्यंत वीटभट्टीचे काम करणाऱ्या सामान्य मजुराला आमदार केले. तर सामान्यातल्या सामान्याला नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगर परिषद अध्यक्ष इत्यादी पदावर नेऊन बसवले. आपल्या संस्थेत अनेकांना नोकरीला लाऊन त्यांचे संसार उभा केले.अशा माणसाच्या पाठीमागे आपली ताकद उभी करून त्यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख