अकोट विधानसभा मतदारसंघात स्थानिक उमेदवारासाठी 'कँपेन'

शिवसेना-भाजप युतीचा गड मानल्या जाणाऱ्या अकोला जिल्ह्यातील अकोट विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीसाठी स्थानिक उमेदवार मिळावा म्हणून भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी 'कँपेन' सुरू केले आहे. अकोट येथे नुकतीच भाजपच्या काही निवडक पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत नेत्यांनी विचार व्यक्त करताना स्थानिक उमेदवाराची मागणी रेटून धरण्यासाठी गल्ली ते दिल्ली अभियान चालविण्याचा निर्धार केला.
अकोट विधानसभा मतदारसंघात स्थानिक उमेदवारासाठी 'कँपेन'

अकोला : शिवसेना-भाजप युतीचा गड मानल्या जाणाऱ्या अकोला जिल्ह्यातील अकोट विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीसाठी स्थानिक उमेदवार मिळावा म्हणून भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी 'कँपेन' सुरू केले आहे. अकोट येथे नुकतीच भाजपच्या काही निवडक पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत नेत्यांनी विचार व्यक्त करताना स्थानिक उमेदवाराची मागणी रेटून धरण्यासाठी गल्ली ते दिल्ली अभियान चालविण्याचा निर्धार केला. 

अकोट विधानसभा मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला येत होता. सन 2009 पर्यंत शिवसेनेने या मतदरासंघात वर्चस्व राखले होते. 2014 च्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिवसेना आणि भाजपचे स्वतंत्र उमेदवार येथे रिंगणात होते. भाजपचे प्रकाश भारसाकळे यांनी काँग्रेसचे महेश गणगणे यांना पराभूत करून हा मतदारसंघ भाजपकडे खेचून आणला. 

भारिप-बमसं तिसऱ्या तर शिवसेना चौथ्या स्थानावर होती. त्यामुळे आता हा मतदारसंघ भाजपकडेच कायम रहावा असा आग्रह भाजप नेत्यांचा आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने जिल्ह्यातील आमदारांसाठी जतना व भाजप कार्यकर्त्यांना आशीर्वाद मागितले, त्यात पुन्हा प्रकाश भारसाकळे यांचाच नामोल्लेख केला. तेव्हापासून अकोट विधानसभा मतदारसंघातील स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. स्थानिक उमेदवार असावा यासाठी सर्वांनी एकत्र येऊन गल्ली ते दिल्लीपर्यंत लढण्याचा निर्धार केला. 

अकोटात झाली बैठक
अकोट येथील भाजप नेत्यांची नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली होते. या बैठकीत सर्व सेलचे नेते उपस्थित होते. वरिष्ठांकडे स्थानिक उमेदवारांचा आग्रह धरण्याबाबत सर्वांनीच विचार व्यक्त केले. यापूर्वी शिवसेना असताना अकोट व तेल्हारा तालुक्याबाहेरील उमेदवार लादण्यात आले. संजय गावंडे यांचा एक अपवाद वगळता सातत्याने बाहेरून उमेदवार लादण्याची परंपरा भाजपनेही 2014 मध्ये कायम ठेवत दर्यापूर येथील प्रकाश भारसाकळे यांनी उमेदवारी दिली. 

स्थानिकांनी त्यांच्या पाठीशी उभे राहत मोठी आघाडी देत विजयी केले. पण, त्यांच्याकडून स्थानिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मान राखला जात नसल्याचा आरोपही या बैठकीत करण्यात आला. भाजपच्या अल्पसंख्यांक समाजातील एका नेत्याने तर वरिष्ठांना स्थानिक नेते दिसत नाही का, असा थेट प्रश्‍न उपस्थित केला. या बैठकीतच स्थानिक उमेदवारासाठी अभियान राबविण्याचा निर्धारही करण्यात आला. त्यासाठी खासदार, पालकमंत्री, पक्ष निरीक्षक, जिल्हाध्यक्ष यांना निवेदने देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com