पिचड पितापुत्रांना दुसरा धक्का देण्याची आमदार लहमाटेंची तयारी...

माजी आमदार मधुकर पिचड आणि वैभव पिचड हे आपल्या गटाचे सभापती-उपसभापती निवडून आणणार का, याकडे लक्ष लागले आहे.
पिचड पितापुत्रांना दुसरा धक्का देण्याची आमदार लहमाटेंची तयारी...

अकोले : अकोले तालुका पंचायत समितीचे सभापती, उपसभापती पदाची मंगळवारी निवड होत असुन या निवड प्रक्रियेत माजी आमदार मधुकर पिचडांचे वर्चस्व राहणार कि महाविकास आघाडी बाजी मारुन भाजपाला विरोधी बाकावर बसवणार याकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

अकोले तालुका पंचायत समितीमध्ये पिचड यांचे तत्कालीन राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचे चार, शिवसेनेचे चार व भाजपचे चार असे पक्षीय बलाबल निवडून आहे. शिवसेनेच्या एका गटाने पाठिंबा देवून पिचड गटाने सेनेचा सभापती, उपसभापती करुन सेनेच्या तालुकाप्रमुखाच्या गटासह भाजपला शह दिला होता.

त्यानंतरच्या कालखंडात अनेक राजकीय घटनाक्रम घडले व विधानसभेला माजी मंञी मधुकर पिचड व माजी आमदार वैभव पिचड यांनी आपल्या समर्थक कर्यकर्त्यासह राष्ट्रवादी कॅाग्रेसला रामराम करत भाजपात प्रवेश केला. यावेळी पिचड यांच्यासमवेत सर्वच कार्यकर्त्यासह पंचायत समितीच्या चार सदस्यांनीही भाजप प्रवेश केला असल्याने भाजपचे मूळ चार अधिक पिचड गटाचे चार अशी आठ सदस्य झाली आहे. 

यात पिचड समर्थक गटाचा गटनेताचा फुटला असल्याने सात सदस्य भाजप अर्थात पिचड गडाकडे यांच्याकडे असल्याची माहिती आहे. या सदस्य संख्येत वाढ होणार असल्याचा कार्यकर्त्याचा दावा आहे तर महाविकास आघाडीने आमच्याबरोबर राष्ट्रवादी कॅाग्रेसचा गटनेता आहे. त्यामुळे त्याच्या `व्हिप`मुळे आमच्याकडे आठ सदस्य असल्याने आमचाच सभापती, उपसभापती होणार असल्याचा दावा केला आहे. दोन्ही बाजूने अतिशय गुप्तपणे हालचाली सुरु आहे. भाजापाकडुन आमचा सभापती होईल असा दावा केला जात आहे माञ संख्याबळ गुप्त ठेवले जात आहे.

दुसरीकडे शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे व उपसभापती मारुती मेंगाळ हे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार डॅा किरण लहामटे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचा सभापती करण्याच्या हालचाली सुरु आहे. त्यांचीही गुप्त यंञणा सुरु आहे. फोडाफोडी, पळवापळवी होण्याची शक्यता आहे. त्याxच्याकडे त्यांचे चार सदस्य आहेत. तसेच जुन्या राष्ट्रवादीच्या गटनेता बरोबर असल्याने इतर सदस्यही मतदान करण्याची शक्यता आहे.

एकूणच निवड अतिशय अटीतटीची व तणाव पूर्ण होण्याची शक्यता आहे .संख्याबळ सादर करताना जर बलाबल सारखे म्हणजेच सहा विरूद्ध सहा झाले तर चिठ्ठीद्वारे निवड केली जाण्याची शक्यता आहे. अकोले पंचायत समिती सभा मंगळवारी सकाळी 11 वा सुरु होऊन दुपारी तीन वाजता सभापती, उपसभापतीची निवड
पंचायत समिती सभागृहात होणार आहे. या वेळी पिठासन अधिकारी अर्थात निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार मुकेश कांबळे हे राहणार आहे .

गट नोंदणीचा वाद हायकोर्टात
अकोले पंचायत समितीत पिचड यांच्या जुन्या राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचा गटनेता गोरख पथवे फुटून मी राष्ट्रवादीतच असल्याची भूमिका घेतल्याने इतर तीन सदस्यांनी नविन गटनोदणी केली होती. त्या गटनोदणीला आक्षेप घेत कोणतीही कायदेशीर पूर्तता न करता माझे गटनेते पद रद्द कसे मीच गटनेता असल्याचा दावा करुन गोरख पथवे यांनी नवीन गटनोंदणीला आव्हान देणारी याचिका औरंगाबाद हायकोर्टात दाखल केली आहे. यावर सकाळी 12 वाजेपर्यंत निर्णय येण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com