इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले कडकडीत बंद

वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत सापडलेल्या निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात आज कडकडीत बंद पाळण्यात आला आहे
Akole Bandh in Support of Indorikar Maharaj
Akole Bandh in Support of Indorikar Maharaj

नगर : वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत सापडलेल्या निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात आज कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. हजारो ग्रामस्थ जमा झाले असून, वारकरी, महिला तसेच नागरिकांनी आज अकोले येथे मोर्चा सुरू केला आहे.

एका कीर्तनातून इंदोरीकर महाराजांनी संततीप्राप्तीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करीत भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी नगरला येऊन निवेदन दिले. तसेच अकोले येथे जावून महाराजांच्या तोंडाला काळे फासवू, असा इशारा दिला होता. त्यामुळे चिडलेल्या अकोले येथील वारकरी व अकोलेकरांनी आज अकोले येथे मोर्चाचे आयोजन केले आहे. 

अकोले तालुक्यातील महिलांनी चिडून देसाई यांना इशारा देत त्यांना अकोले तालुक्यात पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज अकोले येथे बंद पाळण्यात आला आहे. अकोले यालुक्यातील सर्व गावांमध्ये बंदची हाक दिली आहे. इंदोरीकर महाराज हे अकोले तालुक्यातील इंदोरी या गावचे रहिवासी आहेत.  त्यांच्या कीर्तनातून मिळालेल्या मानधनातून तेथे त्यांच्या संस्थेच्या वतीने गरीब मुलांसाठी शाळा चालविली जाते. तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com