वाशीम जिल्हा परिषदेतील सत्तासंतुलनाची परीक्षा, राजकारण वेगळ्या वळणावर?

जिल्हा परिषदेच्या ZP Election १४ तर पंचायत समितीतील २७ जागांची पोटनिवडणूक By-election होत आहे. जिल्ह्यात या निवडणुकीत प्रत्येक ठिकाणी अटीतटीचा सामना होत आहे.
Election Cartoon
Election CartoonSarkarnama

वाशीम : पोटनिवडणूक होत असलेल्या जिल्हा परिषदेतील १४ व पंचायत समितीतील २७ जागा कोणाकडे जाणार, यावरच जिल्हा परिषदेतील सत्तासंतुलन अवलंबून राहणार आहे. सत्तेत असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व वंचित बहुजन आघाडीला गमावलेल्या जागा कमवाव्या लागणार आहेत. अन्यथा जिल्हा परिषदेचे राजकारण वेगळ्या वळणावर जाणार आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीत आरक्षणाच्या मुद्यावर लागलेली पोटनिवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे. उद्या ५ ऑक्टोबरला जिल्हा परिषदेच्या १४ तर पंचायत समितीतील २७ जागांची पोटनिवडणूक होत आहे. जिल्ह्यात या निवडणुकीत प्रत्येक ठिकाणी अटीतटीचा सामना होत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण मर्यादा पन्नास टक्क्यांच्या वर गेल्याने जिल्हा परिषदेतील १४ तर पंचायत समितीतील २७ जागा रिक्त केल्या होत्या. त्यानंतर तीन वेळच्या स्थगितीनंतर आता ही पोटनिवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेतील १४ जागा कोण घेणार यावरच जिल्हा परिषदेतील सत्तासंतुलन अवलंबून असेल. रिसोड तालुक्यात कवठा गटात अपक्ष स्वप्निल सरनाईक, कॉंग्रेसकडून वैभव सरनाईक तर शिवसेनेच्या मंगला सरनाईक असा तिरंगी सामना होत आहे. गोभणी गटातून कॉंग्रेसकडून रेखा उगले शिवसेनेकडून बेबी ठाकरे तर जिल्हा विकास आघाडीचे पुजा भूतेकर रिंगणात आहेत.

https://twitter.com/SarkarnamaNews/status/1444999724826726408

भरजहागीर गटात वंचित बहुजन आघाडीचे अनिल गरकळ, भाजपचे विनोद नरवाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित खडसे तर अपक्ष योगेश वाळके रिंगणात आहेत. मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे गटातून सहा उमेदवार रिंगणात आहेत. कारंजा तालुक्यातील भामदेवी गटातून सहा उमेदवार रिंगणात आहेत. मानोरा तालुक्यातील कुपटा गटातून चार उमेदवार रिंगणात आहेत. तळप गटात चुरशीचा सामना होत असून चार उमेदवाराचे भाग्य ठरणार आहे. फुलउमरी गटातही तीन उमेदवार आपले भाग्य अजमावत आहेत.

Election Cartoon
रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी 3 जानेवारीला निवडणूक

वाशीम तालुक्यातील काटा गटात शिवसेनेच्या लता खानझोडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रियंका देशमुख, काँग्रेसकडून संध्या देशमुख, भाजपकडून रूंदा भिसे तर वंचित बहुजन आघाडीकडून शालिनी राऊत निवडणूक लढवीत आहेत. पार्डीटकमोर गटातून कॉंग्रेसकडून विठ्ठल चौधरी, भाजपकडून सुनील चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस कडून विनोद पट्टेबहादूर, वंचित बहुजन आघाडीकडून प्रल्हाद वाणी तर अपक्ष सरस्वती चौधरी व रामेश्वर कालापाड असे सहा उमेदवार रिंगणात आहेत. उकळीपेन गटात सर्वाधिक चुरस निर्माण झाली आहे या गटातून तब्बल बारा उमेदवार आपले भाग्य अजमावत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com