वाशीम जिल्ह्यातील ‘हे’ आहे समीर वानखेडेंचे मूळ गाव, काका अजूनही राहतात…

समीर वानखेडे Sameer Wankhede यांचे मूळ गाव वाशीम जिल्ह्यातील रिसोड Risod in Washim Taluka तालुक्यात असलेले वरूड तोफा हे आहे.
Sameer Wankhede of Washim
Sameer Wankhede of WashimSarkarnama

वाशीम : ड्रग्स माफियांचा कर्दनकाळ व मुंबईचे सिंघम म्हणून सध्या ज्यांना ओळखले जाते. ज्यांचे नाव घेताच बॉलिवूड जगतातील अनेक सेलीब्रिटी व राजकारणातील बड्या पुढाऱ्यांच्या उरात धडकी भरते, त्या समीर वानखेडे यांचे मूळ गाव कोणते? याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. सोशल मीडिया किंवा अन्य कुठेही त्यांच्या मूळ गावाबाबत माहिती मिळत नसली तरी समीर वानखेडे यांचे मूळ गाव वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात असलेले वरूड तोफा हे आहे. ही बाब वाशीम जिल्हावासीयांकरीता अभिमानास्पद आहे.

समीर वानखेडेंचे सख्खे काका अजूनही वाशीम जिल्ह्यातील लाखाळा या गावात राहतात. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियापासून ते वृत्तपत्र व वृत्तवाहिन्यांच्या हेडलाईन्समध्ये समीर वानखेडे हे नाव झळकत आहे. समीर वानखेडे हे ड्रग्जशी संबंधित प्रकरणाचा छडा लावण्यात तज्ज्ञ मानले जातात. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षात 17 हजार कोटीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलीकडे समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोमध्ये बदली झाली आहे.

सुशांत सिंगपासून तर शाहरूख खानच्या मुलापर्यंत त्यांनी कारवाया केल्या आहेत. शाहरूख खानचा मुलगा आर्यन याला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यापासून राष्ट्रवादीचे नेते व कॅबिनेट मंत्री नबाब मलिक यांनी वानखेडे यांना टार्गेट करणे सुरू केले आहे. समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांवर मलीक यांनी टिका केली होती. समीर वानखेडे यांचा बाप कोण? असा सवाल नबाब मलिक यांनी केला होता. समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे हे वरूड तोफाचे रहिवासी असून त्यांचे शालेय शिक्षण वाशीम जिल्ह्यातच झाले. मुंबई येथे पोलीस विभागात अधिकारी म्हणून नोकरी निमित्त गेले असता त्याठिकाणीच ते स्थायिक झाले. समीर वानखेडे यांचे मोठे बाबा (त्यांच्या वडिलांचे मोठे भाऊ ) दत्तनगर लाखाळा येथे सध्या राहत असून ते ही मुंबई येथे अधिकारी होते.

Sameer Wankhede of Washim
समीर वानखेडे वैतागले; मलिकांना दिला हा इशारा

सेवानिवृत्तीनंतर ते वाशीम येथे स्थायिक झाले. गेल्या दीड वर्षापूर्वी समीर वानखेडे यांचे दत्त नगर येथे राहत असलेले चुलत भाऊ संजय वानखेडे अपघात झाला होता. त्यांना औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले असता समीर वानखेडे हे त्यांच्या भेटीकरिता औरंगाबाद येथे आले होते. समीर वानखेडे यांचे मूळ गाव असलेले वरूड तोफा हे गाव वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात येत असून वाशीम-रिसोड मार्गावरील आसेगावपासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. याठिकाणी समीर वानखेडे यांचे वडिलोपार्जित घर व शेती आहे. त्यांचे काका, काकू व भावंड येथे राहतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com