'नीट रहा नाहीतर ठोकून काढेन'; भाजप आमदाराचा बॅंक व्यवस्थापकाला दम...

अतिवृष्टीमुळे Heavy Rainfall मिळालेली मदत व पिकविम्याची Crop insurance रक्कम शेतकऱ्यांना न देता परस्पर पीककर्ज खात्यात वळती करून त्या खात्याला होल्ड लावला होता.
Shweta Mahale
Shweta MahaleBuldhana Reporter

बुलढाणा : अतिवृष्टीमुळे मिळालेली मदत व पिकविम्याची आलेली रक्कम शेतकऱ्यांना न देता परस्पर पीककर्ज खात्यात वळती करून त्या खात्याला होल्ड लावणाऱ्या चिखली तालुक्यातील चांडोळ येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या व्यवस्थापकाला जाब विचारण्यासाठी शेतकऱयांसोबत गेलेल्या चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महलेंचा पारा चांगलाच वर गेलेला दिसला. यावेळी उत्तर देऊ न शकलेल्या बँक व्यवस्थापकाला ''या ठिकाणी राहायचे असेल तर, नीट रहा नाहीतर ठोकून काढेन..!" अशी धमकी दिली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे.

अतिवृष्टीमुळे मिळालेली मदत व पिकविम्याची आलेली रक्कम शेतकऱ्यांना न देता परस्पर पीककर्ज खात्यात वळती करून त्या खात्याला होल्ड लावणाऱ्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या व्यवस्थापकाला आमदार श्वेत महलेंनी अक्षरशा धारेवर धरले. आज त्यांनी शेतकऱ्यांसह बँक ऑफ महाराष्ट्राच्या चांडोळ शाखेत जाऊन व्यवस्थापकाला सज्जद दम भरला.

Shweta Mahale
भाजप फुटीच्या उंबरठ्यावर! आता तिसऱ्या मंत्र्याचा राजीनामा

त्या म्हणाल्या, आदेश दाखव, कुठले आदेश आले आहेत ते. आमदारांचे फोन घ्यायचे नाहीत, या विषयी कुठला आदेश आहेत. गर्दी होतेय म्हणून सदर रक्कम देण्याऐवजी ते खात्यात वळती करण्याची सूचना आली होती. पण, आता हे पैसे शेतकऱ्यांना देण्याचे आदेश आल्याचे व्यवस्थापकाने सांगितले.

Shweta Mahale
शिवसेना सोडण्याविषयी महेश शिंदे म्हणतात...

''आमदारांचे फोन घ्यायचे नाहीत, असे आदेश आले आहेत.ते कुठून आले आहेत. फटके देऊन सरळ करेन तुला. राहायचे असेल तर नीट रहा, नाहीतर ठोकून काढेन,'' असा दम आमदार श्वेता महलेंनी भरला. तसेच शेतकऱ्यांचे यापुढे कुठलेही पैसे बँकेत जमा झाले तरी त्यांला होल्ड लावायचा नाही, अशी सूचनाही त्यांनी केली. त्यानंतर सदर व्यवस्थापकाने पैसे आजपासूनच शेतकऱ्यांना दिले जातील, असे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in