अर्बन सेलच्या माध्यमातून राष्ट्रवादीची निवडणुकांची तयारी...

केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम होणार नाही तर अर्बन सेलच्या माध्यमातून दीर्घ काळासाठी उपाययोजनांवर काम केले जाणार असल्याचे त्या MP Vandana Chavan म्हणाल्या.
Vandana Chavan, Pravi Kunte Patile at Akola
Vandana Chavan, Pravi Kunte Patile at AkolaSarkarnama

अकोला : वाढत्या शहरीकरणासोबत शहरातील नागरिकांच्या समस्याही वाढत आहेत. त्याचा मागोवा घेऊन पर्यावरण, घनकचरा व महिला सुरक्षेसह ज्येष्ठ नागरिक व युवकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेलच्या माध्यमातून आगामी काळात भरीव काम केले जाणार आहे. याबाबतची माहिती राष्ट्रवादी अर्बन सेलच्या प्रदेशाध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. तर आगामी महापालिका निवडणुकांची तयारी म्हणूनही याकडे पाहिले जात आहे.

पत्रकार परिषदेला सेलचे कार्याध्यक्ष सुरेश पाटील, आमदार अमोल मिटकरी, प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील, माजी आमदार तुकाराम बिडकर, ज्येष्ठ नेते डॉ. संतोष कोरपे, प्रा. विश्वनाथ कांबळे, महानगराध्यक्ष विजय देशमुख, नगरसेविका उषा विरक, डॉ. आशा मिरगे, प्रा. विजय उजवणे, मो. रफिक सद्दीकी, बुढण गाडेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. खासदार चव्हाण यांनी अर्बन सेल सुरू करण्यामागील शरद पवार यांची भूमिका पत्रकार परिषदेत सांगितली. राजकारण करताना त्याला समाजकारणाची जोड देत ८० समाजकारण व २० टक्के राजकारण या भूमिकेवर चालत राष्ट्रवादी काँग्रेसने काम सुरू केले असल्याचे त्या म्हणाल्या.

अकोला शहरातील घनकचरा, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, महिला सुरक्षा व इतर बाबींवर काम करण्यासाठी प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली जात आहे. त्यासाठी अर्बन सेलच्या जिल्हा कार्यकारिणीचीही निवड करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. या सेलमध्ये वेगवेगळ्या विषयावर काम करणाऱ्या १० समिती राहणार असून, नियोजनबद्धरीत्या शहरातील समस्यांवर मार्ग काढण्यासाठी काम केले जाणार असल्याचे त्या म्हणाल्या.

या विषयांवर होणार काम

शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणे, वृक्षारोपण वाढणे, ग्रीन कव्हरवर भर देणे, वृक्ष गणना करणे, कार्बन इनव्हेंट्री, महिला सुरक्षा, युवक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थिनींच्या समस्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा अर्बन सेल भविष्यात काम करणार आहे.

Vandana Chavan, Pravi Kunte Patile at Akola
भाजपच्या नाकर्तेपणामुळे स्मार्ट पुण्याचे रॅंकिंग घसरले - खासदार वंदना चव्हाण

निवडणूक जुमला ठरणार नाही !

महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्बन सेलच्या माध्यमातून काम केले जात असल्याने हा केवळ निवडणूक जुमला ठरणार काय, याबाबत विचारणा केली असता खासदार चव्हाण यांनी या विषयावर फार पूर्वीपासून म्हणजे सन २०१९ पासून काम सुरू असल्याची माहिती दिली. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम होणार नाही तर अर्बन सेलच्या माध्यमातून दीर्घ काळासाठी उपाययोजनांवर काम केले जाणार असल्याचे त्या म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com