राज्यातल्या जिम सुरु करण्याबाबत नाना पटोलेंनी दिल्या 'या' सूचना

जिम (व्यायामशाळा)व इतर व्यवसाय कोरोनामुळे ठप्प झाल्याने बेरोजगारी वाढत आहे. त्यामुळे ह्या सर्वावर विचार करत स्वतःच्या अॅडव्हायजरी काढून जिम व इतर व्यवसाय सुरु करत न्याय द्यावा, अशा सूचना दिल्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पाटोले यांनी सांगितले आहे. त्यामुळे जिम चालकांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत
Nana Patole asked government to make own Advisory to start gyms
Nana Patole asked government to make own Advisory to start gyms

भंडारा : देशभरात अनलाॅकिंगची प्रक्रिया सुरु झाली असली तरीही जिम सुरु झालेल्या नाहीत. राज्यातही हीच परिस्थितीत आहे. अशा स्थितीत स्वतःची 'अॅडव्हायजरी' (मार्गदर्शक सूचना) काढून राज्य सरकारने जिम सुरु कराव्यात, असा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या आहेत. 

राज्यात वाढती बेरोजगारी लक्षात घेता जिम (व्यायामशाळा) महाराष्ट्र्र सरकारने स्वतः पुढाकार घेत केंद्र सरकारच्या अॅडव्हायजरी येण्याची वाट न बघता स्वतःच्या ऍडवायझरी काढून जिम सुरु करावी,अशी सूचना केल्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पाटोले यांनी येथे सांगितले. मुळातच अनलॉक बाबत केंद्र सरकार अॅडव्हायजरी काढत असून त्यांच्या अॅडव्हायजरीचे पालन  राज्य सरकार करते असते. 

जिम (व्यायामशाळा)व इतर व्यवसाय कोरोनामुळे ठप्प झाल्याने बेरोजगारी वाढत आहे. त्यामुळे ह्या सर्वावर विचार करत स्वतःच्या अॅडव्हायजरी काढून जिम व इतर व्यवसाय सुरु करत न्याय द्यावा, अशा सूचना दिल्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पाटोले यांनी सांगितले आहे. त्यामुळे जिम चालकांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या जिम चालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. कोरोनाचा लाॅकडाऊन झाल्यापासून जिम, व्यायामशाळा बंद आहेत. अनेकांनी यात मोठी गुंतवणूक केली आहे. मात्र, राज्यातल्या जिम अद्याप सुरु न झाल्याने जिम चालक अत्यंत अडचणीत आले आहेत. घेतलेले कर्ज, जागांचे भाडे असा सगळाच भार त्यांच्या डोक्यावर आहे. त्यामुळे जिम सुरु करुन दिलासा द्यावा या अपेक्षेने जिम चालकांनी राज ठाकरे यांची 'कृष्णकुंज' निवासस्थानी भेट घेतली होती. मी या संदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो असून नियम पाळून जिम सुरु करायला हरकत नाही, असे त्यांचेही मत असल्याचे राज यांनी त्यावेळी सांगितले होते.
Edited By - Amit Golwalkar 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com