गोपीकिशन बाजोरिया विरुद्ध चैनसुख संचेती, असा सामना होण्याची चिन्हे!

महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया Gopikishan Bajoriya यांचे नाव निश्चित आहे.
Gopikishan Bajoriya and Chainsukh Sancheti
Gopikishan Bajoriya and Chainsukh SanchetiSarkarnama

अकोला : राज्यातील पाच विधानपरिषद मतदारसंघांसह अकोला, विधान परिषदेच्या अकोला- वाशीम- बुलडाणा या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला. येत्या 10 डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून, 14 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. दर सहा वर्षांनी होणाऱ्या या निवडणुकीच्या निमित्ताने अकोला जिल्ह्यासह तिन्ही जिल्ह्यात राजकीय मोर्चेबांधणीचा धुराळा सुरू झाला आहे.

या निवडणुकीची आचारसंहिता आजपासून तिन्ही जिल्ह्यांत लागू झाली आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत या मतदारसंघात बघावयास मिळणार आहे. सध्या अकोला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया करीत आहेत. त्यांचा विद्यमान कार्यकाळ 1 जानेवारी 2022 रोजी संपत आहे. त्यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक घेणे क्रमप्राप्त होते. त्यानुसार निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. अकोला- वाशीम-बुलडाणा या तीन जिल्ह्यांतील जिल्हा परिषद सदस्य, महानगरपालिका सदस्य, नगरपालिका, नगरपंचायत सदस्य आणि पंचायत समिती सभापती यांना मतदानाचा हक्क आहे.

सन 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत तिन्ही जिल्ह्यांतील एकूण 790 मतदार होते. त्यात अकोला येथील शिवसेनेचे उमेदवार गोपीकिशन बजोरिया यांनी विजयाची ‘हॅट्‍ट्रिक’ साजरी केली होती. भाजपची शिवसेनेसोबत युती होती. बजोरिया यांनी राष्ट्रवादीचे रवी सपकाळ यांच्यावर मात केली होती. बाजोरियांना 513 तर सपकाळ यांना 239 मते मिळाली होती. राष्ट्रवादी व काँग्रेसने ही निवडणूक एकत्र लढविली होती. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार असून या विधानपरिषद निवडणुकीत एकत्र येणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगणार आहे. दरम्यान निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचे नाव निश्चित आहे. भाजपकडून बुलडाणा जिल्ह्यातील माजी आमदार चैनसुख संचेती यांचे नाव आघाडीवर आहे. याशिवाय अकोल्यातील वसंत खंडेलवाल, विजय अग्रवाल, शेगाव येथील शरद अग्रवाल, वाशीम जिल्ह्यातील विजय जाधव यांचीही नाव चर्चेत आहे.

‘वंचित’ची तलवार म्यानच!

विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीने अद्याप कोणतीही तयारी केलेली नाही. या निवडणुकीसाठी वंचितची तलवार अद्याप म्यानच आहे. मात्र, ऐनवेळी वंचित निवडणुकीच्या रिंगणात उडी घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. बुलडाणा जिल्ह्यातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व वंचितच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. वंचित बहुजन आघाडीकडे तिन्ही जिल्ह्यांत मिळून १०० च्या जवळपास सदस्य असून, ते या निवडणुकीत निर्णायक भूमिकेत असतील.

Gopikishan Bajoriya and Chainsukh Sancheti
अकोला : ४ जागा जिंकून वंचितने बाजी मारली

असा आहे मतदारसंघ-

अकोला जिल्हा - एक महानगरपालिका, पाच नगर परिषद, एक नगर पंचायत, सात पंचायत समिती सभापती.

बुलडाणा जिल्हा ः ११ नगर परिषद, दोन नगर पंचायत, १३ पंचायत समिती सभापती.

वाशीम जिल्हा ः चार नगर परिषद, दोन नगर पंचायत, सहा पंचायत समिती सभापती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com