'महाबीज' संचालकपदी खासदार संजय धाेत्रेंचा पाचव्यांदा दणदणीत विजय

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या संचालक पदाच्या निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार संजय धाेत्रे यांनी सलग पाचव्यांदा विजयी हाेत विराेधी पक्ष काँग्रेस, भारिप-बमसंला जाेरदार धाेबीपझाड दिली अाहे.
'महाबीज' संचालकपदी खासदार संजय धाेत्रेंचा पाचव्यांदा दणदणीत विजय

अकाेला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या संचालक पदाच्या निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार संजय धाेत्रे यांनी सलग पाचव्यांदा विजयी हाेत विराेधी पक्ष काँग्रेस, भारिप-बमसंला जाेरदार धाेबीपझाड दिली अाहे.

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या भागधारक मतदार संघाचा निकाल शनिवारी (ता.20) जाहीर करण्यात अाला. या निवडणुकीत या निवडणुकीत खासदार संजय धाेत्रे यांनी पाचव्यांदा उमेदवारी दाखल केली हाेती. त्यांच्या विराेधात शेतकरी जागर मंचचे प्रशांत गावंडे निवडणुकीच्या मैदानात उतरले हाेते. या निवडणुकीत खासदार धाेत्रे यांना शह देण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशाेक चव्हाण, भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश अांबेडकर यांनी फिल्डिंग लावत प्रशांत गावंडे यांना बळ पुरविले हाेते. मात्र, मतदार संघातील शेतकरी, सभासदांच्या न्याय हक्कासाठी अविरतणे केलेल्या कार्यामुळे मतदारांनी खासदार धाेत्रे यांना पाचव्यांदा संचालक पदावर विजयी करून विराेधी पक्ष काँग्रेस, भारिप-बमसंला जाेरदार धक्का दिला अाहे.

या निवडणुकीत खासदार धोत्रे यांना 9406 मते मिळाली तर गावंडे यांना 3986 मते भेटली. एकूण मतदानाच्या तुलनेत धोत्रे यांच्या मतांची टक्केवारी 70.25 तर गावंडे यांना 29.75 टक्के मते भेटली. त्यामुळे संजय धोत्रे यांची संचालकपदी निवड जाहीर करण्यात अाली. महाबीजच्या उर्वरीत मतदार संघातील तिघांनी अर्ज मागे घेतल्याने बुलडाणा जिल्ह्यातील अमडापूरचे वल्लभराव देशमुख हे बिनविराेध विजयी झाले अाहेत.

खासदार धाेत्रे यांच्या विजयाची घाेषणा हाेताच अामदार गाेवर्धन शर्मा, अामदार रणधीर सावरकर, महापाैर विजय अग्रवाल, भाजप जिल्हाध्यक्ष तेजराव थाेरात, महानगराध्यक्ष किशाेर मांगटे पाटील, अकाेला बाजार समितीचे सभापती शिरीष धाेत्रे, डॉ. रणजित सपकाळ यांच्यासह भाजपचे सर्व नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी विजयाचा जल्लाेष केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com