शिवसेना आमदाराला 'आप'ने करून दिली विजबिल माफी आश्‍वासनाची आठवण 

कोरोना संकटकाळात जेथे दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, तिथे हजारो रुपयांचे वीजबिले कशी भरावीत? निवडणुकीच्या काळात 300 युनिटपर्यंत विजबिल माफीचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले? वीजदरात 30 टक्के कपात कुठे आहे? या प्रश्नांची उत्तरे मागण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या शिवसेना आमदारांच्या घरापुढे आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी (ता. 9 ऑगस्ट) लॉकडाउन असतानाही ठिय्या आंदोलन केले.
AAP reminds Shiv Sena MLA of electricity bill apology assurance
AAP reminds Shiv Sena MLA of electricity bill apology assurance

अकोला : कोरोना संकटकाळात जेथे दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, तिथे हजारो रुपयांचे वीजबिले कशी भरावीत? निवडणुकीच्या काळात 300 युनिटपर्यंत विजबिल माफीचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले? वीजदरात 30 टक्के कपात कुठे आहे? या प्रश्नांची उत्तरे मागण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या शिवसेना आमदारांच्या घरापुढे आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी (ता. 9 ऑगस्ट) लॉकडाउन असतानाही ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाद्वारे सत्ताधाऱ्यांना त्यांच्या आश्वासनाची आठवण करून देण्यात आली. 

कोरोना संकट काळात अनेकांचा रोजगार हिरावला गेला. दोन वेळ जेवणाची सोय लावतानाही अनेक कुटुंबाची फरपट होत आहे. दुसरीकडे सत्ताधारी पक्षाने निवडणूक काळात दिलेल्या आश्वासनांचा विसर पाडत कोरोना काळातील तीन महिन्यांचे अव्वाच्या सव्वा बिले ग्राहकांच्या माथी मारले आहेत. ज्यांची दोनवेळ जेवणाची सोय नाही, ते हजारो रुपयांची वीजबिले कशी भरणार? त्यांना वीजबिल माफ करण्यासंदर्भात सरकारकडून कोणतीच उपाय योजना का केली जात नाही, असे प्रश्न उपस्थित करीत आम आदमी पार्टीने राज्यभर आंदोलन केले आहे. 

सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेना आमदारांच्या घरापुढे रविवारी ठिय्या देवून आणि आमदारांना घेराव घालून त्यांच्या पक्षाने निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यात आली. 300 युनिटपर्यंतची वीज माफी, 30 टक्के वीज दरकपात, वीज वहन व वीज आकार रद्द करण्याच्या आवश्वासनाची सत्ताधाऱ्यांनी पूर्ती करावी, या मागणीसाठी ठिय्या देण्यात आला. त्यासोबतच कोरोना काळातील 200 युनिटपर्यंतचे वीज बिल माफ करण्यात यावे. ज्यांनी वीजबिल भरले आहे, त्यांचे पुढच्या बिलात समायोजन करण्यात यावे, अशी मागणीही आंदोलकांनी केली. 

या आंदोलनात आपचे अमरावती विभागीय संयोजक शेख अन्सार, महानगर सहसंयोजक संदीप जोशी, संघटक ठाकूरदास चौधरी, सचिव गजानन गणवीर, सहसचिव अलिम मिर्झा, प्रभारी जिल्हा संयोजक अरविंद कांबळे, काझी लायक अली, अ. रफिक आदींनी सहभाग घेतला होता. 

मुख्यमंत्र्यांपर्यंत आमचे म्हणणे पोचवा ! 

कोरोना संकट काळातील वीजबिल माफी आणि निवडणुकीच्या काळात शिवसेनेने दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन "आप'च्या पदाधिकाऱ्यांना शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांना रविवारी सोपविले. आपण सर्वसामान्यांवर पडलेला वीजबिलांचा भार कमी करण्यासाठी आमचे म्हणणे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवा, अशी विनंती आंदोलकांनी आमदारांना केली. 

आंदोलनस्थळी पोलिस 

शहरात रविवारी एक दिवसाचा लॉकडाउन असताना शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार विल्पव बाजोरीया यांच्या निवास स्थान परिसरात "आप'च्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. या वेळी पोलिसांनी आंदोलनस्थळी धाव घेत माहिती घेतली. त्यांची नावे लिहून घेतली. 

'आप'ने केलेल्या मागण्या 

►कोव्हिड काळातील चार महिन्यांचे 200 युनिटपर्यंचे वीजबिल माफ करा. 
►शिवसेनेने निवडणुकीपूर्वी 300 युनिटपर्यंतचे दर 30 टक्के कमी करण्याच्या दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता करावी. 
►एक एप्रिलपासून केलेली वीज दरवाढ रद्द करण्यात यावी. 
►वीजबिलातील वहन आकार, वीज आकार रद्द करण्यात यावा. 
► वीज कंपन्यांचे सीएजी ऑडिट करण्यात यावे. 
►टाळेबंदी काळात वीजबिल भरलेल्या ग्राहकांचे रक्कम पुढील बिलातून वजा करण्यात यावे. 

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com