बोरगाव मंजू येथे दारू दुकानांविरुद्ध महिलांचा एल्गार 

महामार्गावर न्यायालयाच्या आदेशाने बंद झालेल्या दारूच्या दुकानाला बोरगाव मंजू गावातील भरवस्तीत दुकान स्थलांतरणास प्रशासनाने दिलेल्या परवानगीला महिलांनी तीव्र विरोध केला आहे. या दारुच्या दुकानावर हल्लाबोल करीत महिलांनी दारूच्या बॉटल रस्त्यावर फोडल्या. महिलांचे हे आंदोलन एवढ्यावरच थांबले नसून शनिवारी (ता.17) हे दारू विक्रीचे दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी शेकडो महिलांनी एकत्रीत येत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
बोरगाव मंजू येथे दारू दुकानांविरुद्ध महिलांचा एल्गार 

अकोला : महामार्गावर न्यायालयाच्या आदेशाने बंद झालेल्या दारूच्या दुकानाला बोरगाव मंजू गावातील भरवस्तीत दुकान स्थलांतरणास प्रशासनाने दिलेल्या परवानगीला महिलांनी तीव्र विरोध केला आहे. या दारुच्या दुकानावर हल्लाबोल करीत महिलांनी दारूच्या बॉटल रस्त्यावर फोडल्या. महिलांचे हे आंदोलन एवढ्यावरच थांबले नसून शनिवारी (ता.17) हे दारू विक्रीचे दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी शेकडो महिलांनी एकत्रीत येत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. 

राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील पाचशे मिटरच्या अंतरावरील सर्व दारू दुकाने बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या आदेशानंतर मद्य सम्राटांकडून प्रशासनाशी हातमिळवणी करीत अनेक दुकाने भर वस्तीत स्थलांतरीत करण्याचा सपाटा लावला. अकोला शहरात अशा दारु दुकानांविरुद्ध सामाजिक संघटनांनी आंदोलनाचा एल्गार पुकारल्यानंतर आता ग्रामीण भागातही दारू दुकानाविरुद्ध आंदोलन पेटले आहे. महामार्गावर असलेल्या बोरगाव मंजू गावात स्थलांतरीत करण्यात आलेल्या दारू विक्री दुकानाविरुद्ध महिलांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. गावातील दारू दुकाने, वाइनबार, बिअरशॉपी नव्याने स्थलांतरीत करू नये, अशी मागणी करीत महिलांनी ठाणेदारांना निवदेन दिले. त्यानंतर शेकडो महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून गावात सुरू असलेले दारू दुकाने बंद करण्याची मागणी केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com