शेतकऱ्यांनो, महाखोटारड्या लोकांपासून सावधान : शिवसेना 

कर्जमाफीचा निर्णय घेण्यापूर्वीच भाजपचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या आभाराचे लावलेले पोस्टर फाडल्यानंतर आज शुक्रवारी (ता. नऊ) शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी शहरात सर्वत्र 'शेतकऱ्यांनो, महाखोटारड्या लोकांच्या फसव्या जाहिरातीपासून सावधान' असे 'पोस्टर' लावून भाजपची टर उडवली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मित्र पक्ष भाजपलाच शिवसेनेकडून कोंडीत पकडण्यात येत असून त्यात आता अशा 'पोस्टर-वॉर'ने राजकीय वातावरण तापविले आहे.
शेतकऱ्यांनो, महाखोटारड्या लोकांपासून सावधान : शिवसेना 

अकोला : कर्जमाफीचा निर्णय घेण्यापूर्वीच भाजपचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या आभाराचे लावलेले पोस्टर फाडल्यानंतर आज शुक्रवारी (ता. नऊ) शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी शहरात सर्वत्र 'शेतकऱ्यांनो, महाखोटारड्या लोकांच्या फसव्या जाहिरातीपासून सावधान' असे 'पोस्टर' लावून भाजपची टर उडवली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मित्र पक्ष भाजपलाच शिवसेनेकडून कोंडीत पकडण्यात येत असून त्यात आता अशा 'पोस्टर-वॉर'ने राजकीय वातावरण तापविले आहे. 

राज्यात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पेटला असून विरोधी पक्ष कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटनांसह अनेक सामाजिक संघटनांकडून कर्जमाफीच्या मुद्यावर रान पेटविले जात आहे. कर्जमाफीच्या मुद्यावर भाजप सरकारकडून शेतकऱ्यांच्या अडवणुकीचे धोरण राबविण्यात येत असल्याने केंद्र व राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेनेकडूनही आक्रमक होत भाजप सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करण्यात येत आहे. कर्जमाफीचा निर्णय होण्याआधीच अकोल्यात पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी कर्जमाफी केल्याद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभाराचे पोस्टर शहरात ठिक-ठिकाणी लावले होते. 

कर्जमाफी न करता भाजपच्या मंत्र्यांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात येत असून भाजप नेत्यांचा हा प्रकार म्हणजे 'मूल होण्याआधीच पेढे वाटणे' असा असल्याचा हल्लाबोल शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी करीत शिवसैनिकांनी गुरूवारी (ता.आठ) शहरात भाजपकडून लावण्यात आलेले सर्व पोस्टर फाडून टाकण्यात आले होते. बसस्थानक चौकात तर मुख्यमंत्र्यांच्या पोस्टवरील फोटोला शेण फेकून शिवसैनिकांनी आपला रोष व्यक्त केला होता. कालच्या या आंदोलनानंतर आज शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन देशमुख यांनी भाजपने लावलेल्या त्याच ठिकाणी "शेतकऱ्यांना आजवर आत्महत्या करण्यास मजबूर करणाऱ्या महाखोटारड्या लोकांच्या फसव्या जाहिरातीपासून सावधान' असे पोस्टर झळकविल्याने हे पोस्टर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com