akola politics | Sarkarnama

अकोल्यातील करवाढीविरोधात भारिप-बमसंचा एल्गार 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 2 मे 2017

अकोला महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासन नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यास अपयशी ठरले असताना केवळ मालमत्तांवर अवाजवी करवाढ करून नागरिकांवर अन्याय करण्यात येत असल्याने या करवाढीविरोधात भारिप-बमसंने एल्गार पुकारला आहे. 

अकोला : महानगरातील नागरिकांना रस्ते, पाणी, अस्वच्छता, पथदिवे अशा विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासन नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यास अपयशी ठरले असताना केवळ मालमत्तांवर अवाजवी करवाढ करून नागरिकांवर अन्याय करण्यात येत असल्याने या करवाढीविरोधात भारिप-बमसंने एल्गार पुकारला आहे. 

अकोला महापालिका क्षेत्रातील मालमत्तांची सुधारित दराने करवाढ करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. ही करवाढ सुमारे 30 ते 80 टक्‍यांपेक्षा अधिक असून, हा सर्वसामान्य अकोलेकरांवर अतिरिक्त भार असल्याचे भारिप-बमसंच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

प्रशासनासह सत्ताधाऱ्यांनी केलेली करवाढ नागरिकांवर अन्यायकारक असून, त्या बदल्यात मूलभूत सुविधांची वाणवा आहे. महानगरातील सर्वच प्रभागातील समस्या सोडविण्यास प्रशासन व सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. निव्वड नागरिकांकडून कर वसूल करण्याचा अट्टहास प्रशासनाकडून करण्यात येत आहे. प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या करवाढीला भारिप बमसंने तीव्र विरोध केला आहे. ही करवाढ मागे घेण्यासाठी भारिप-बमसंच्या महापालिकेतील गटनेत्या डॉ. धनश्री देव, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, नगरसेवक बबलू जगताप, नगरसेविका किरण बोराखडे, गजानन गवई, रणजित वाघ, अरुंधती शिरसाट, रामा तायडे, वंदना वासनिक, मंगला घाटोळे, पराग गवई आदी पदाधिकाऱ्यांनी खंडेलवाल टॉवर येथे स्वाक्षरी अभियान सुरू केले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख