akola politics | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

अकोल्यात सभापतिपदासाठी भाजपच्या "यंग ब्रिगेड'मध्ये रस्सीखेच 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

अकोला महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपच्या यंग ब्रिगेड मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. विशेष म्हणजे त्यात बाळ टाले आणि अजय शर्मा यांची नावे आघाडीवर आहे.

अकोला : महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपच्या यंग ब्रिगेड मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. विशेष म्हणजे त्यात बाळ टाले आणि अजय शर्मा यांची नावे आघाडीवर आहे. खासदार संजय धोत्रे यांचे वजन ज्याच्या पारड्यात पडेल, तोच सभापती पदावर विराजमान होणार असल्याने सध्या भाऊंची मर्जी आपल्याकडे वळवण्यासाठी इच्छुकांचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. 

अकोला महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वाधिक अठ्ठेचाळीस नगरसेवक विजयी करीत भाजपने एकहाती सत्ता ताब्यात घेतली आहे. महापौर, उपमहापौर निवडीनंतर महापालिकेत स्थायी समितीसाठी धुमशान सुरू झाले आहे. भाजपच्या दहा सदस्यांसह सदस्यीय स्थायी समितीचे गठण करून सदस्यांची नावे विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आली आहे. त्यांच्याकडून मान्यता मिळून सभापती निवडण्यासाठी स्थायी समितीची विशेष सभा बोलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

एप्रिलपूर्वी सभा बोलाविली जाण्याची शक्‍यता आहे. महापालिकेच्या आर्थिक नाडी समजल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभापती पदासाठी सध्या भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. सभापती पदावर युवा नगरसेवकाची वर्णी लागण्याची शक्‍यता असून यामध्ये बाळ टाले आणि अजय शर्मा यांची नावे आघाडीवर आहेत. बाळ टाले हे खासदार संजय धोत्रे यांचे तर अजय शर्मा हे आमदार गोवर्धन शर्मा यांचे निकटवर्तीय समजले जातात. 

महापालिका कोअर कमिटीचे प्रमुख पद खासदार धोत्रे यांच्याकडे होते. त्याच्याच नेतृत्वात भाजपने या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली. त्यात आमदार गोवर्धन शर्मा आणि आमदार रणधीर सावरकर यांची भक्कम साथ त्यांना मिळाली. त्यामुळे सभापती पदावर खासदार धोत्रे ज्याही नगरसेवकाला समोर करीत त्याची सभापती पदावर वर्णी लागणार आहे. सध्या तरी इच्छुकांकडून खासदार धोत्रे यांची मन वळविण्याचा प्रयत्न सुरू असून त्यांची हिरवी झेंडी मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख