akola politics | Sarkarnama

अकोल्यातील पोटनिवडणुकीत भाजपने मारली बाजी

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रिक्त झालेल्या जागांसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत भारिप बमसंच्या ताब्यात असलेल्या कुटासा पंचायत समिती गणात भाजपने दणदणीत विजय मिळविला आहे. दानापूर जिल्हा परिषद गट ताब्यात ठेवण्यात भारिप बमसंला यश आले आहे. 

अकोला :  जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रिक्त झालेल्या जागांसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत भारिप बमसंच्या ताब्यात असलेल्या कुटासा पंचायत समिती गणात भाजपने दणदणीत विजय मिळविला आहे. दानापूर जिल्हा परिषद गट ताब्यात ठेवण्यात भारिप बमसंला यश आले आहे. 

अकोला जिल्हा परिषदेच्या दानापूर सर्कलचे सदस्य राजेश खोने यांच्या निधनानंतर हे पद रिक्त झाले होते. भारिप बमसंचे कुटासा पंचायत समितीचे सदस्य श्रीकृष्ण चव्हाण यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. जिल्हा परिषदेच्या दानापूर गटातून भारिप बमसंचे श्रीकांत खोने विजयी झाले. कुटासा पंचायत समिती गणातून भाजपचे अर्जुन सोळंके यांनी भारिप बमसंच्या सुभाष सोनोने यांचा पराभव केला. 

अकोला पूर्व मतदार संघात येत असलेल्या कुटासा पंचायत समितीची ही पोटनिवडणूक भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांच्यासाठी प्रतिष्ठेची झाली होती. भारिप बमसंचे जिल्हा परिषद कृषी सभापती राहिलेले रामदास मालवे यांच्या सर्कलमध्ये येत असलेल्या कुटासा गणाच्या पोटनिवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाल्याने मतदारसंघावरील आमदार सावरकरांची पकड अधिक मजबूत झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दानापुर गटातून भारिप बमसंचा विजय हा जिल्हा परिषदेत पक्षाचे संख्याबळ वाढविण्यास पोषक ठरला असला तरी कुटासा पंचायत समितीची जागा भारिप बमसंला गमवावी लागली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख