भाजपच्या खासदार-आमदारांनी केली अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल

भाजपच्या खासदार, आमदारांनी केलेल्या चौकशीच्या मागणीवर समितीचा तीन दिवसांचा दौरा असून जिल्हा परिषदेच्या नियमबाह्य कामकाजाचे आता पोस्टमार्टंम करतो, असे समितीचे अध्यक्ष आमदार प्रकाश भारसाकळे म्हणाले. सुनावणी दरम्यान हे सर्व मुद्दे बाहेर निघतच असेही ते म्हणाले.
Akola BJP
Akola BJP

अकोला : महाराष्ट्र विधानमंडळाच्या पंचायत राज समितीच्या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी भाजपचे खासदार, आमदारांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी मनमानी कारभार करीत विविध योजनेत केलेल्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल केली. अध्यक्ष महोदय येवढा भ्रष्ट कारभार चालत असेल तर ग्रामविकास कसा साधणार? असा प्रश्न उपस्थितीत करीत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी खासदार संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा यांनी रेटून धरली. 

अकोला जिल्हा परिषदेच्या कामकाजासह विविध विभागामार्फंत राबविण्यात आलेल्या योजनांचा आढावा घेण्यासाठी पंचायत राज समिती (पीआरसी) आज जिल्हा परिषदेत दाखल झाली. सकाळी अकरा वाजताच जिल्हा परिषदेच्या सभागृहात पीआरसीचे अध्यक्ष आमदार प्रकाश भारसाकळे यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित झाले.

आढावा बैठक सुरू होत असतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, महापौर विजय अग्रवाल, भाजप जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, अकोला पंचायत समितीचे उपसभापती गणेश अंधारे, अंबादास उमाळे यांच्यासह पदाधिकारी सभागृहात आले.

आमदार भारसाकळे यांना जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या शिक्षक भरती घोटाळा, सीसीटीव्हीची नियमबाह्य खरेदीसह अनेक योजनांमध्ये केलेल्या नियमबाह्य कारभाराची माहिती दिली. केंद्र व राज्य शासन ग्रामविकासाच्या कल्याणकारी योजना राबवित असतांना काही अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे ग्रामविकासाचा मुळ उद्देशालाच हरताळ फासल्या जात आहे. अनेक योजनांची नियमबाह्य अंमलबजावणी करून शासनाला लाखो रुपयांचा चुना लावण्याचे काम सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांनी संगनमताने केले असून या कारभाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी खासदार, आमदारांनी केली. 

तीन दिवसात पोस्टमार्टंम करतो 
भाजपच्या खासदार, आमदारांनी केलेल्या चौकशीच्या मागणीवर समितीचा तीन दिवसांचा दौरा असून जिल्हा परिषदेच्या नियमबाह्य कामकाजाचे आता पोस्टमार्टंम करतो, असे समितीचे अध्यक्ष आमदार प्रकाश भारसाकळे म्हणाले. सुनावणी दरम्यान हे सर्व मुद्दे बाहेर निघतच असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com