In Akola NCP & Congress are working as B team for BJP | Sarkarnama

 काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष अकोल्यात भाजपची ‘बी टीम’

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे यांनी पत्रकार परिषद घेवून माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांच्यावर हल्लाबोल केला.

अकोला : राज्यात भाजपची सत्ता कुणामुळे टिकून आहे? जिल्ह्यात लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना कोण मदत करतो? हे जनतेला माहिती आहे. जिल्ह्यात भाजपची ‘बी टीम’ म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस काम करीत असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये, असे प्रत्युत्तर भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे यांनी दिले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष गुलाबराव गावंडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदे घेवून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टिका करणारे भारिप-बमसंचे बाळासाहेब आंबेडकर खोटे बोलत असल्याचा हल्लाबोल केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून बुधवारी सायंकाळी भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे यांनी पत्रकार परिषद घेवून माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांच्यावर हल्लाबोल केला.

" कुण्याही एका पक्षात कायम न राहू न शकलेले गुलाबराव गावंडे यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये. ते ज्या काळातील दाखले देत आहेत, त्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस जन्मालाही आली नव्हती . त्यावेळी काँग्रेसमध्ये शरद पवारांचे किती वजन होते, याचीही सर्वांना कल्पना आहे . आता गावंडे यांनीच आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली असल्याचा सल्लाही  प्रदीप वानखडे   यांनी   दिला. 

या पत्रकार परिषदेला भारिपचे जिल्हा प्रवक्ते प्रा.डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, महिला आघाडीच्या अध्यक्ष प्रभाताई सिरसाट, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई वाघाेडे, उपाध्यक्ष जमीरखाँ अमानउल्लाखाँ, भारिपचे महासचिव ज्ञानेश्‍वर सुलताने, महानगराध्यक्ष सिमांत तायडे आदींची उपस्थिती होती.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख