भाजपला दुसरा झटका 

महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदान प्रक्रियेला अवघे काही तास शिल्लक असताना भाजपचे उमेदवार पोलिस प्रशासनाच्या रडावर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
भाजपला दुसरा झटका 

अकोला : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदान प्रक्रियेला अवघे काही तास शिल्लक असताना भाजपचे उमेदवार पोलिस प्रशासनाच्या रडावर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

मतदारांना पैसे वाटल्याच्या गुप्त माहितीवरून रविवारी भाजपच्या महिला उमेदवारांच्या घरावर पोलिसांनी छापा टाकून एक लाख पंधरा हजाराची रक्कम जप्त केली. त्यानंतर आता महापालिकेचे विद्यमान स्थायी समिती सभापती व उमेदवार विजय अग्रवाल यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा शिवसेना माजी जिल्हाप्रमुखांच्या तक्रारीवरून अग्रवाल यांच्याविरुद्ध सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

महापालिका निवडणुकीच्या रणसंग्रामात "एकला चलो रे'चा नारा देत स्वबळावर निवडणुकीत लढविणाऱ्या सत्ताधारी भाजपने निवडणुकीत कंबर कसली आहे. मात्र, ऐन मतदान प्रक्रियेला काही तास शिल्लक असताना भाजपसमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. रविवारी भाजपच्या एका महिला उमेदवाराकडून मतदारांना पैसे वाटप होत असल्याच्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी उमेदवाराच्या घरी छापा टाकून एक लाख पंधरा हजाराची रोकड रविवारी जप्त केली होती.

या घटनेच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख विजय मालोकार यांच्या तक्रारीवरून महापालिकेचे विद्यमान स्थायी समिती सभापती व प्रभाग क्रमांक पाचचे अधिकृत उमेदवार विजय अग्रवाल यांनी संत गजानन महाराज यांच्या नावाचा बॅनरवर वापर करून निवडणूक प्रचाराची मुदत संपल्यानंतरही बॅनर काढले नसल्याने आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार केली. या तक्रारीवरून सिव्हिल लाइन पोलिसांनी विजय अग्रवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com