मुंबई विद्यापीठाला अण्णाभाऊ साठेंचे नाव द्या : मधुकरराव कांबळे 

संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा बुलंद आवाज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव मुंबई विद्यापीठाला द्यावे, अशी मागणी राज्यमंत्री दर्जा असलेले साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष तथा सदस्य सचिव मधुकरराव कांबळे यांनी केली आहे.
मुंबई विद्यापीठाला अण्णाभाऊ साठेंचे नाव द्या : मधुकरराव कांबळे 

अकोला : संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा बुलंद आवाज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव मुंबई विद्यापीठाला द्यावे, अशी मागणी राज्यमंत्री दर्जा असलेले साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष तथा सदस्य सचिव मधुकरराव कांबळे यांनी केली आहे. 

या विद्यापीठाला राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव देण्याचा प्रस्ताव शिवसेनेने सादर केला असून आता मधुकरराव कांबळे यांनी अण्णाभाऊ साठेंचे नाव देण्याची मागणी केल्याने विद्यापीठाच्या नावावरून नवा राजकीय वाद रंगण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवार (ता.15) आयोजित पत्रकार परिषदेत मधुकरराव कांबळे यांनी ही मागणी केली. यावेळी श्री. कांबळे म्हणाले, की मुंबई विद्यापीठाला अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव सर्वांत आधी आम्ही सरकारकडे दिला होता. मात्र, शिवसेनेकडून आता मॉं जिजाऊ यांचे नाव देण्याचा प्रस्ताव आला आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संपूर्ण जीवन हे मुंबईत गेले आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अण्णाभाऊ बुलंद आवाज होते. अवघ्या दीड दिवसांची शाळा शिकून स्वतःच्या अलौकीक साहित्य तत्वज्ञानाचे विद्यापीठ अण्णाभाऊ होते. 

अण्णाभाऊंनी आयुष्यभर कामगार, कष्टकरी, मानवतावादी विचारांचा झंझावत ठेवत साहित्य निर्मिती केली. त्यामुळे मुंबई विद्यापीठाला "साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विद्यापीठ' असे नामकरण करावे, अशी मागणी मधुकरराव कांबळे यांनी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि समाजवादी पार्टीचे नेते आमदार अबु आझमी यांना पत्र देऊन या प्रस्तावाला पाठिंबा देण्याची मागणी केल्याचे श्री.कांबळे यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com