अकोला जिल्हा कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी हिदायत पटेल

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी अकोला जिल्हा (ग्रामिण) काँग्रेस कमिटीच्या नवीन कार्यकारीणीला मान्यता दिली. या जम्बो कार्यकारिणीमध्ये जिल्ह्यातील सर्व जाती, धर्माच्या जुन्या व नवीन कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे.
अकोला जिल्हा कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी हिदायत पटेल

अकोला : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी अकोला जिल्हा (ग्रामिण) काँग्रेस कमिटीच्या नवीन कार्यकारीणीला मान्यता दिली. या जम्बो कार्यकारिणीमध्ये जिल्ह्यातील सर्व जाती, धर्माच्या जुन्या व नवीन कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. 

अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हिदायत पटेल यांनी आज ही नवीन कार्यकारिणी जाहीर केली. यात उपाध्यक्षपदी हेमंत देशमुख, रमेश म्हैसने, रामसिंग जाधव, सुनील धाबेकर, बबनराव डाबेराव, प्रमोद डोंगरे, अ.रज्जाक अ. सत्तार सेठ, अनंत बगाडे, प्रकाश तायडे, रामचंद्र बरेठीया, संजय बोडखे, राजेश भारती, डॉ.झिशान हुसेन, आनंदराव देशमुख, डॉ. अनंत भुईभार, ऐनोद्दीन खतीब, डॉ.तिलकराज सरनाईक, डॉ.प्रमोद चोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोषाध्यक्षपदी डॉ.सुभाषचंद्र कोरपे यांची तर सरचिटणीसपदी डॉ.अशोक बिहाडे, डॉ.रितेश अग्रवाल, सै.बु-हान सै.नबी, अॅड. मनोज खंडारे, शंकरराव लंगोटे, बाळकृष्ण बोंद्रे, विजय दुतोंडे, सतीश मखराम पवार, संजय आठवले, नलिनीताई सुभाष लटकुटे, पंढरी हाडोळे, देविदास बुले, पुष्पाताई धुमाळे, राजेश मते, जमील कुरेशी, गणेशराव महाले, आशुतोष बाळासाहेब तायडे, रामदास ठाकरे, प्रशांत भटकर यांची नियुक्ती करण्यात आली.

सरचिटणीस प्रशासन या पदावर डॉ.मनोहर दांदळे, गजानन देशमुख, तश्वर पटेल यांची तर चिटणीसपदी मधुकर मावसे, प्रा.वासुदेवराव चुळे, सुरेश गिऱ्हे, अनोख राहाणे, वासुदेव डोलारे, हुकुमचंद शर्मा, शे.जमीर अहमद, दीपक माने, डॉ.नवीन तिरुख, अॅड.श्रीकृष्ण राहाणे, मनीष भांबुरकर, रमेश भगत, रामकृष्ण घाटे, सै. वासीफ सै.कय्युम, विजय बलोदे, गजानन वानखेडे, पांडुरंग वाडेकर, सै.मजहर अली अफसर अली, मो.इरफान अ. सत्तार, बंडुभाऊ डाकोरे यांची नियुक्ती करण्यात आली.
सहचिटणीस सुरेश मानपूत्र, डॉ. हिम्मतराव घाटोळ, प्रवीण महाले, स्वप्नील मोरे, अजय टापरे, संजय पेटकर, सौ.शोभा बावणे, समाधान राठोड, चंद्रशेखर चिंचोळकर, जितेंद्र गुल्हाने, भास्कर मोडोकार, श्रीकृष्ण मालठाणे, मो.अकरम शेख इमाम, अॅड.मंगेश बुटे, रावसाहेब साबळे, अ.वहाब अ.रहमान, सुभाष वानखेडे, देविलाल तायडे, खाँजा साकीबोद्दीन खाँजा जहिरोद्दीन यांची नियुक्ती करण्यात आली.

कार्यकारिणी सदस्य प्रभाकर नगराळे, सै. मिरसाहेब सै. रब्बील, अतुल ढोले, अन्सार दौलत पटेल, बन्सीलाल भोगे, युनुस खॉ अलीदाद खॉ, संदीप खारोडे, रामभाऊ गायकवाड, प्रशांत देशमुख, नरेंद्र सरोदे, पुरुषोत्तम डिगांबर ढोर, सुनील घावट, डॉ. गुलाम नबी अ.मजीद, शाम ढाकरे, गजानन मुंगसे, वसंतराव पवार, मोहन अंजनकर, निलेश चतरकर, अमोल ठाकरे, मो. रजाउलहक अ.कय्युम उर्फ बब्बुभाई, गजानन गोमटे, मो. अनिस इकबाल शे. नजीर, संतोष गोरे, शेख सलीम शेष रोशन, मोहन पाटील,  हारुन शहा म. अनिक शहा, दीपक पोहरे, डॉ. विट्ठलराव घोडे, विनोद राऊत, तुळशीराम भरणे, मुरलीधर पुरंगे यांची नियुक्ती करण्यात आली.

स्थायी निमंत्रित व मार्गर्शकांमध्ये दिग्गज
स्थायी निमंत्रित व मार्गर्शक पदाधिकारी म्हणून बाबासाहेब धाबेकर, मखराम पवार, अजहर हुसेन, सुधाकरराव गणगणे, रामदास बोडखे, अँड.नतिकोद्दीन खतीब, लक्ष्मणराव तायडे, सुरेश कानोत, बट्रेन्ड मुल्लर, ज्ञानदेवराव ठाकरे, बबनराव चौधरी, मदन भरगड, डॉ. सुधीर ढोणे, अॅड. अनिल पाचडे, शिवाजीराव देशमुख, दादाराव मते पाटील, रमाकांत खेतान, विजय कौसल, शोएब अली मीर साहेब, नानाराव देशमुख, दिनेश शुक्ला, अविनाश देशमुख, अर्जुन थानवी, महेंद्रसिंग सलुजा, लखुआप्पा लंगोटे, अ.जब्बार अ. रहमान, पंजाबराव सिरसाट, साजीद खान पठाण, अ.खलील शे.मुर्तुजा, डॉ. संजीवनी बिहाडे, पुष्पाताई गुलवाडे, मो. रफीक मो.सईद पटेल, डॉ. शैलेष देशमुख, अशोक दुबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कपिल रावदेव, अशोक घाटे प्रसिद्ध प्रमुख
प्रसिध्दी प्रमुखपदी  कपिल रावदेव (इलेक्ट्रॉनिक),  अशोक घाटे (वृत्तपत्र) , भूषण टाले (सोशल) यांची तर प्रचार प्रमुखपदी श्याम भोपळे, श्रीकृष्ण ढोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com