Akola election | Sarkarnama

अकोल्यात उद्या काढणार "ईव्हीएम'ची शवयात्रा 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

अकोला : महापालिका निवडणुकीत "ईव्हीएम'मध्येच तांत्रिक बिघाड करून भाजपने स्वतःचा विजय खेचून आणल्याचा सर्व पक्षाच्या पराजित उमेदवारांनी केलेल्या तक्रारीचे प्रकरण गंभीर वळणावर आले आहे. सर्व पक्षीय नेते व उमेदवारांनी स्थापन केलेल्या ईव्हीएमविरोधी संघर्ष समितीतर्फे मंगळवारी ईव्हीएमची शवयात्रा काढण्यात येणार आहे. 

अकोला महापालिका निवडणुकीत ऐंशी जागांपैकी अठ्ठेचाळीस जागांवर निर्विवाद विजय मिळवीत भाजपने सत्ता ताब्यात घेतली. या विजयामुळे विविध पक्षातील दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजपचे इतके उमेदवार कसे जिंकू शकतात, असा प्रश्‍न सर्वांनाच पडलेला आहे. त्यातून भाजप वगळता राष्ट्रवादी कॉंग्रेस, भारिप बहुजन महासंघ, कॉंग्रेस, शिवसेना, मनसेसह आदी पक्षांच्या नेत्यांनी व उमेदवारांनी ईव्हीएम विरोधी संघर्ष समिती स्थापन करून या प्रकरणात पराभूत उमेदवारांच्या बाजूने न्यायालयीन लढा देण्याचे ठरविण्यात आले. या सोबतच मतदान व मतमोजणीत घोटाळा झाल्याचा आरोप करीत सर्व पक्षीय नेते, पराभूत उमेदवारांनी बैठक घेऊन मंगळवारी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ईव्हीएमचा वाद पेटला असून याचे राजकीय पडसाद कसे पडतात? हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख