निलंबनाच्या कारवाईला सत्काराने उत्तर !  - akola corporation politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

निलंबनाच्या कारवाईला सत्काराने उत्तर ! 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 30 मे 2017

जनतेच्या प्रश्नावर आवाज उठविणारे शिवसेनेचे गटनेते राजेश मिश्रा, नगरसेवक गजानन चव्हाण, शशी चोपडे, मंगेश काळे यांचा शिवसैनिकांसह अकोलेकरांकडून ठिकठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. 

अकोला : महापालिका प्रशासनाने केलेल्या करवाढीविरोधात आवाज उठविणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवकांवर महापौरांनी केलेल्या निलंबनाच्या कारवाईनंतर भाजप-शिवसेनेत राजकारण पेटले आहे. जनतेच्या प्रश्नावर आवाज उठविणारे शिवसेनेचे गटनेते राजेश मिश्रा, नगरसेवक गजानन चव्हाण, शशी चोपडे, मंगेश काळे यांचा शिवसैनिकांसह अकोलेकरांकडून ठिकठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. 

अकोला महापालिका प्रशासनाने शहरातील मालमत्ताधारकांना नुकत्याच कर मूल्यांकनाच्या नोटीस बजावल्या. पंधरा वर्षांनंतर करण्यात आलेली ही करवाढ अन्यायकारक असून एकाच वेळी मालमत्ताधारकांना चार-पाच पटीने वाढीव कर आकारण्यात आल्याने या करवाढीला महापालिकेतील विरोधी पक्ष कॉंग्रेस, शिवसेना, भारिप बमसं आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने तीव्र विरोध केला आहे. सत्ताधारी करवाढ करून नागरिकांची पिळवणूक करीत असल्याचा आरोप करीत ही करवाढ रद्द करण्याची मागणी विरोधी पक्षांनी रेटून धरली आहे. 

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत कॉंग्रेस आणी शिवसेनेच्या नगरसेवकांनी या मुद्यावर सभागृह दणाणून सोडले होते. त्यानंतर महापौर विजय अग्रवाल यांनी विरोधी पक्षनेते साजीद खान पठाण, शिवसेनेचे गटनेते राजेश मिश्रा, नगरसेवक गजानन चव्हाण यांना निलंबीत केले. लोकशाहीत विरोधी पक्षाची मुस्कटदाबी करून जनतेच्या प्रश्नावर आवाज उठविणाऱ्या नगरसेवकांना निलंबीत करून भाजपने अकोलेकरांचा नसता रोष ओढवून घेतला आहे. करवाढीवर विरोध करणाऱ्या शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा, गजानन चव्हाण, शशी चोपडे, मंगेश काळे यांचा अकोल्यात ठिकठिकाणी सत्कार करून सत्ताधारी भाजपवर टिकेची झोड उठविण्यात येत आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख