कॉंग्रेसचे निवडणूक अधिकारी उद्या अकोल्यात

मात्र, हा वाद प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्याकडे गेल्यावर त्यांनी पक्षातंर्गत वाद तातडीने मिटविण्याचे निर्देश दिले. त्यानंतर दोन्ही गटात उघडपणे विरोधाची धार कमी झाली असली तरी आतून एकमेकांची उणे-दुणे काढणे सुरूच आहे.
कॉंग्रेसचे निवडणूक अधिकारी उद्या अकोल्यात

अकोला : जिल्ह्यातील कॉंग्रेस पक्षात नेतृत्व बदलाचे वारे जोरात वाहत असून शहर व जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या संघटनात्मक निवडणुकीला वेग आला आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्याचे निवडणूक निर्णय अधिकारी बिहारचे आमदार राजेशकुमार मंगळवारी (ता.26) अकोल्यात दाखल होत असून ते पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. 

केंद्र व राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर विरोधी बाकावर बसलेल्या कॉंग्रेसने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेता मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जिल्ह्यातील नगरपालिका, महापालिका निवडणुकीत दारून पराभव झाल्यानंतर पक्षातंर्गत कुरघोडीचे राजकारण उफाळून आले. त्यातूनच मग पराभवाचे खापर जिल्हा व शहराच्या पदाधिकाऱ्यांवर फोडत नेतृत्व बदलाची मागणी जोर धरायला लागली होती. 

मात्र, हा वाद प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्याकडे गेल्यावर त्यांनी पक्षातंर्गत वाद तातडीने मिटविण्याचे निर्देश दिले. त्यानंतर दोन्ही गटात उघडपणे विरोधाची धार कमी झाली असली तरी आतून एकमेकांची उणे-दुणे काढणे सुरूच आहे. सध्या कॉंग्रेसमध्ये संघटनात्मक निवडणुकीला वेग आला आहे. जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी असलेले बिहार राज्यातील आमदार राजेशकुमार 26 आणि 27 सप्टेंबर असे सलग दोन दिवस स्थानिक स्वराज्य भवनात बैठक घेऊन कॉंग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. मंगळवारी शहराची तर बुधवारी ग्रामीण पदाधिकाऱ्यांची बैठक होत असून या बैठकीत कोणता विषय गाजतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com